आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडा:वजन कमी करण्यामागील विज्ञान आणि व्यवस्थापन

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा की, मंद चयापचय, कमकुवत हाडे, म्हातारे होत चालले स्नायू आणि लाचारीसारखे बहाणे बनवण्याऐवजी वजन कमी करण्यामागील शास्त्र समजून घ्या आणि मग स्वतःचे व्यवस्थापन तंत्र तयार करा.

५३ वर्षांचे अाध्यात्मिक वक्ते सुमीत पोंदांसाठी भोपाळमधील आपल्या दोन संस्था रेड रोज ग्रुप आॅफ स्कूल्स आणि एमके पोंदा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट सांभाळणे अवघड काम नाही. पण त्यांच्यासाठी सर्वात अवघड काम स्वत:़चे १४१ किलो वजन सांभाळणे होते. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी एक आव्हान स्वीकारले आणि १३ जून २०२२ पर्यंत १०३ किलो वजन कमी केले. आता त्यांना आपले वजन दोन अंकात करायचे आहे.

ते क्रॅश डाएट किंवा कठाेर व्यायामावर विश्वास करत नाहीत. ‘छोटी चीजें बड़ा बदलाव लाती हैं..’ असे त्यांचे मत आहे. दोन पुस्तकांचे लेखक सुमीत आणखी तीन पुस्तके लिहीत आहेत. काल आमच्यात झालेल्या बातचीतवरून मी काही कामाच्या टिप्स काढल्या आहेत.. त्या पुढीलप्रमाणे आहेत...

स्नॅक खाण्यावर नियंत्रण करावे : स्नॅक खाण्यावर नियंत्रण करावे. ४५ ग्रॅमच्या क्रिस्पी पॅकेटमध्ये २४० कॅलरीज असतात आणि हे छोटेसे पॅकेट रोज खाल्ले तर वर्षभर ६.४ किलो वजन वाढते. स्नॅक्सचा थेट प्रभाव स्वभावावर पडतो. ते शरीराच्या भुकेचे हाॅर्मोन घ्रेलिनसह डोपामाइन (प्रोत्साहित आणि पुरस्काराचा भाव निर्माण करणारे केमिकल) आणि सेरोटॉनिन (आनंद, शांती अाणि ध्यानासाठी जबाबदार)ची पातळी प्रभावित होऊ शकते. हार्मोन्स मेंदूशी थेट संवाद साधताे आणि भुकेची सूचना देताे, हे रहस्य नाही. जास्त वजन असलेल्या लोकांच्या वजनाचा स्नॅकिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे.

हायड्रेटेड राहा : सुमीतचे वजन कमी करण्यामागचे हे मोठे रहस्य आहे. डिहायड्रेशनमधून मीठ-साखरेची क्रेव्हिंग होते. कारण आपल्याला दिवसभर पुरेसे पोषण मिळत नसल्याचे शरीराला वाटते. दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यायला हवे, असे तज्ज्ञ म्हणतात. जेव्हा मेंदूला स्नॅकची गरज असते तेव्हा हर्बल चहा प्यावा आणि २० मिनिटांनंतर फरक पाहा, यामुळे बऱ्याचदा स्नॅकची इच्छा नाहीशी होते. पुरेशी झोप घ्या : अभ्यासावरून कळते की, झोपेच्या कमतरतेमुळे घ्रेलिनची पातळी वाढते आणि लेप्टिनची पातळी कमी होते (पोट भरल्यासारखे वाटते). झोपेच्या कमतरतेमुळे शरीराला भूक लागते अाणि जंक फूड खाण्याची इच्छा होते. त्यात कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि साखर भरपूर असते.

खाण्यात जागरूकता ठेवा : मीटिंगमध्ये टेबलावर फळे आणि बिस्किटे ठेवलेली असतात, पण आपण फळे सोडून बिस्किटे उचलतो, कारण फळे सोलून काढावी लागतात आणि मीटिंगमध्ये असे करणे चांगले वाटत नाही. पण काही खाण्याची इच्छा झाली तर चांगली फायबर असलेली फळे निवडा. केळी, बदाम इत्यादी कोणतेही फळ खाऊ शकता. खाण्याच्या पद्धती ओळखण्यासाठी स्वतःला, तुमच्या भावना आणि तुमच्या व्यवहारावर लक्ष द्यावे लागेल. शरीराचा मेंदू स्कॅन केल्याने तुम्हाला तुमच्या आहारातील निवडीबद्दल जागरूक राहण्यास मदत होईल.

मेंदूला पुन्हा प्रशिक्षण द्या : असे बरेच लोक आहेत, ज्यांनी कार्बोनेटेड पेयांचे नाव बदलून “ऑस्टिओपोरोसिस’ केले. कारण या पेयांचे जास्त सेवन आणि हाडांची घनता यांच्यातील संबंध आहे. तेव्हापासून त्यांची कोला घेण्याची इच्छा संपली. त्याचप्रमाणे तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करा की, कुरकुरीत तळलेले बटाटे खाऊ नये, त्यात बऱ्याचदा बटाटे नसतात तर फक्त चव आणि रसायने असतात. पॅकबंद खाद्यपदार्थांऐवजी स्वतःचे अन्न शिजवणे तुम्हाला त्यातील घटक आणि शरीराशी असलेल्या संबंधांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल.

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन

बातम्या आणखी आहेत...