आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कुटुंब दिन विशेष:कुटुंबाच्या आनंदाचे शास्त्र : आदर करा, ऐकून घ्या आणि खऱ्याला खरे म्हणा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय करायचे आहे आणि काय करावे यात समतोल साधा आपल्या रिकाम्या वेळात तुम्ही काय करावे आणि काय करायला पाहिजे? यात फरक असू शकतो. तुम्हाला स्वतःसाठी काही करायचे आहे, पण त्या इच्छेपेक्षा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे तुम्हाला वाटते. ही कोंडी तुम्ही कशी हाताळता हे महत्त्वाचे आहे. हे तुमच्या इच्छा आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा यांच्यात संतुलन राखण्यासारखे आहे.

विज्ञान म्हणते की कोंडी हा एकमेव पुरावा आहे की तुम्हाला कुटुंबाबद्दल प्रेम आहे. अशा स्थितीत काय करावे हा मार्ग जे निवडतात, ते कौटुंबिक जीवनात अधिक समाधानी असतात.

पती-पत्नीच्या कुटुंबाला भावनात्मक आधाराची प्रणाली माना सासरचेे सदस्य म्हणजे- तेे व्यक्ती जे नेहमी गोष्टींकडे तुमच्या मुलगा वा मुलीच्या दृष्टिकोनातून पाहतील, तुमच्या दृष्टिकोनातून नाही. जोडीदाराचे कुटुंबासोबत असण्याचेसुद्धा दोन फायदे आहेत- एक म्हणजे भावनिक समर्थन प्रणाली असते. दुसरे- हे असे नातेवाईक आहेत जे जोडीदाराला आधीच ओळखतात, त्यामुळे चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते.

आवडीचा नाही, योग्य निर्णय घ्या, दीर्घकाळात भावना बदलतात जरुरी नाही की तुम्ही नेहमी कुटुंबाच्या सहमतीने निर्णय घ्यावा, शक्य आहे की कुटुंबाला निर्णय थोड्या वेळासाठी पसंद नसेल, पण दीर्घ आवश्यकतांसाठी जर ते फायद्याचे आहे, तर त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. भले हे कठीण वाटेल. कारण भावना नेहमी एकसारखी राहत नाही. जे निर्णय आज कुटुंबाला चुकीचे वाटत आहे ते भविष्य चांगले वाटू शकतील. विज्ञान म्हणते की वयानुसार समज आणि परिपक्वता येते. अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये, दीर्घकाळासाठी, कुटुंब योग्य निर्णयांना महत्त्व देते, लोकप्रिय निर्णयांना नाही.

विज्ञान म्हणते की ज्या कुटुंबामध्ये पती-पत्नीचे नाते चांगले असते, तेथे वैवाहिक जीवनातील समाधान आणि आनंदाची पातळी १३ टक्क्यांपर्यंत जास्त असते.

कुटुंबाच्या परंपरा पाळा, एकी वाढेल
प्रत्येक कुटुंबाच्या काही परंपरा आहेत. उदाहरणार्थ, आठवड्यातून एकदा पूजा, विधी किंवा सुटीच्या दिवशी करावयाची विशेष कामे. या परंपरा पालक किंवा आजी-आजोबा चालवतात. त्या कुटुंबाची ओळख आहेत. या माध्यमातून कुटुंबातील सदस्य एकमेकांशी जोडलेले राहतात.
विज्ञान म्हणते की सातत्याने केलेले कौटुंबिक अनुष्ठान मुलांमध्ये सामाजिक विकास वाढवते. यामुळे नवीन पिढीमध्ये कौटुंबिक एकतेची भावना १७ टक्क्यांपर्यंत वाढते.

तक्रार असल्यास लगेच प्रतिक्रिया देऊ नका, आधी आदरपूर्वक ऐका
काही वेळा कुटुंबातील एखादा तुमच्यावर नाराज होऊ शकतो आणि तुमची टीकाही करू शकतो किंवा तुम्हाला रागावू शकतो. तो चुकीचाही असू शकतो; परंतु अशा परिस्थितीत सर्वप्रथम आपण आपला संयम न गमावता त्याचे पूर्णपणे ऐकले पाहिजे. कारण तुमची कटू प्रतिक्रिया किंवा मतभेदामुळे नाते बिघडू शकते. तक्रारी किंवा समस्यांचे नंतरही निराकरण होऊ शकते.

विज्ञान सांगते की कुटुंबातील १० पैकी ८ प्रसंगी सदस्य एकमेकांकडे तक्रार करू शकत नाहीत. कारण ते नाराजीबद्दल काळजीत असतात. त्यामुळे नात्यात तणाव वाढू लागतो.

सकारात्मक विचार करा, यामुळे काैटुुंबिक तणाव कमी होतो
जेव्हा तुम्ही तणावाच्या परिस्थितीतून जात असाल, तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन राखणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही समस्येकडे दुर्लक्ष केले पाहिजे; परंतु अशा परिस्थितीत नकारात्मक परिणामांपासून लक्ष हटवले पाहिजे. यातून चांगल्या भविष्याकडे कसे जायचे याचा विचार केला पाहिजे. कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे असते.

विज्ञान सांगते की, जेव्हा एखादी व्यक्ती भविष्याचा सकारात्मक विचार करते तेव्हा तो कुटुंबाचा विश्वास जिंकतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा ताण ६०% पर्यंत कमी होतो.

कुटुंबात अडचण असेल तर कुणाशी तरी शेअर करा, समाधान मिळेल
कुटुंबात अडचणी येणे सामान्य आहे. असे कठीण प्रसंग तुम्ही कोणाशीही शेअर करू शकता. हे मित्र, शेजारी, समर्थक गट किंवा सामाजिक गटदेखील असू शकतात. आपण गोष्टी शेअर करतो तेव्हा आपल्याला कळते की, आपण एकटे नाही. अशाप्रकारे, सल्ल्याच्या रूपात तुम्ही इतरांच्या अनुभवाचा फायदा घेऊ शकता.

विज्ञान सांगते की अशा ९९ टक्के प्रकरणांमध्ये चर्चेनंतर उपयुक्त उपाय समोर आले आहेत. तर ९४ टक्के लोकांना एखाद्याशी चर्चा केल्यानंतर भावनिकदृष्ट्या बरे वाटते, असे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...