आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या:श्रीरामांच्या मूर्तीसाठीचे शाळीग्राम खडक अयोध्येत झाले दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेपाळहून खास आणण्यात आलेले दोन शाळीग्राम खडक बुधवारी रात्री अयोध्येत दाखल झाले. या खडकांपासून श्रीरामांची मूर्ती कोरली जाणार असून ती गर्भगृहात ठेवली जाणार आहे. यानिमित्त गुरुवारी दुपारी विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ५१ वैदिक शिक्षकांनी खडकांची पूजा केली.यानंतर नेपाळच्या जानकी मंदिराचे महंत तपेश्वर दास यांनी खडक राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सोपवले. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्रसिंग पंकज २५ जानेवारी रोजी नेपाळच्या मुस्तंग जिल्ह्यातून शाळीग्राम खडक घेऊन अयोध्येसाठी निघाले होते. साधारण ६० दशलक्ष वर्षे जुने हे दोन खडक दोन वेगवेगळ्या ट्रकमधून आणण्यात आले. एका खडकाचे वजन २६ टन तर दुसऱ्याचे १४ टन आहे.

बातम्या आणखी आहेत...