आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार चोकअप:चक्क ड्रेनेजवरच थाटले दुकान ; अनेकांकडून अतिक्रमण

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील काही भागात ड्रेनेजलाइन चोकअप झाल्यानंतर वारंवार निवेदने, फोन करून मनपा कर्मचाऱ्यांकडे जेटिंग मशीनसाठी तगादा लावला जातो. परंतु, चेलीपुऱ्यात ड्रेनेजलाइन चोकअप होताच मनपा कर्मचारी मशीन घेऊन येतात. मात्र, चेलीपुऱ्यात व्यापाऱ्यांनी चक्क किराणासह इतर दुकाने रस्त्यावरील ड्रेनेजच्या चेंबरवर थाटली आहेत. त्यांनी चेंबरच दुकानाच्या आतील भागात फरशीखाली झाकून टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे ड्रेनेजलाइन दुरुस्तीसाठी मोठी अडचण येत आहे. शहागंजकडून चेलीपुऱ्याकडे येताना डाव्या बाजूच्या आरोग्य केंद्रांलगत किराणासह इतर दुकाने थाटली आहेत. काही वर्षांपूर्वी वाहतुकीला अडथळा होत असल्याने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली होती. तसेच मनपाची जुनी इमारतही पाडली होती. सदर भागातून जिल्हाधिकारी कार्यालय, दिल्ली गेटमार्गे हर्सूलकडे मोठ्या संख्येने वाहनधारक ये-जा करतात. त्यासाठी रस्ता रुंदीकरण केले होते. मात्र, काही वर्षांपासून या रस्त्यावरील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने पुढे घेऊन ड्रेनेजलाइन आत फरशीखाली दाबली आहे. वाढत्या दुकानांच्या अतिक्रमणांमुळे ड्रेनेजलाइन दुरुस्तीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती मनपा कर्मचाऱ्यांनी दिली. दुकानांच्या आत चेंबर : चेलीपुऱ्यातील रस्त्यावरील ड्रेनेजलाइन वारंवार चोकअप होत असल्याने व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाला सांगून जेटिंग मशीन बोलावली. चोकअप शोधताना एका दुकानात चेंबर दिसले. मनपा कर्मचाऱ्यांनी चेंबर उघडून चोकअप काढले. या रस्त्यावर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आपली दुकाने रस्त्यावर आणली आहेत. त्यावर मनपा प्रशासन कधी कारवाई करेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सदरील रस्त्यावरील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता काहींनी उत्तर देण्याचे टाळले, तर काहींनी १२ वर्षांतून एकदा लाइन चोकअप झाली असून चेंबर आमच्या दुकानांच्या पायऱ्यांच्या बाजूला असल्याचे सांगितले.

चेंबर दुकानात; कारवाई झाली पाहिजे ^शहागंज ते चेलीपुरा रस्त्यावर पाचशे ते सहाशे दुकाने आहेत. एका बाजूने ड्रेनेजलाइन असून त्यावर दुकाने समोर आणून अतिक्रमण करणे चुकीचे आहे. यावर मनपाने कारवाई केली पाहिजे. तसेच जर दुकानात चेंबर असेल तर ते चुकीचेच आहे. -कचरू वेळंजकर, अध्यक्ष, चेलीपुरा बाजारपेठ.

बातम्या आणखी आहेत...