आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी नीलकृष्ण देशपांडे लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन:एकांत न मिळणाऱ्यांचा आकांत : चपळगावकर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकांत हा एकप्रकारचा कधीच नसतो. आपण एकटे जरी असलो तरी अनेक आठवणी मनात येत असतात. आता मात्र शहरात एकांत मिळत नाही. त्यामुळे एकांत न मिळणाऱ्यांचा आकांत हे कवी नीलकृष्ण देशपांडे यांचे एकांताचा आकांत पुस्तक आहे, असे मत साहित्यिक आणि सेवानिवृत्त न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी व्यक्त केले.

राजहंस प्रकाशन कार्यालयात रविवारी साहित्यिक आणि पत्रकार यांच्या संडे क्लबमध्ये देशपांडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर होते. राधाकृष्ण मुळी, शाहू पाटोळे यांची उपस्थिती होती.चपळगावकर म्हणाले, या काव्यसंग्रहात एकही शब्द असा नाही ज्याचा अर्थ नाही. एका छोट्या गावातून वाङ्मयावरच प्रेम टिकवणे अवघड असून महत्त्वपूर्ण असा हा संग्रह आहे. अध्यक्षीय समारोप करताना बर्दापूरकर कविता लिहिणे सोपे नाही. कवितेसाठी निष्ठा लागते. ती कवी नीलकृष्ण देशपांडे यांच्यामध्ये आहे. निसर्गाचा तजेलदारपणा त्यांच्या कवितेत आहे. संग्रही ठेवावा, असा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचावा, असेही बर्दापूरकर म्हणाले. मुळी यांनी सूत्रसंचालन केले.