आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिम:पाेलिसांच्या अभिप्रायानंतर वॉर्डात बॅनरसाठी हाेणार जागा निश्चित

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर विद्रूप होऊ नये यासाठी शुभेच्छांचे बॅनर लावण्यासाठी ९ झोनमधील जागा निश्चित केली आहे. या जागेबाबत अभिप्राय घेण्यासाठी आता ही यादी पोलिस प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरात मनपाकडून बॅनर पॉलिसी तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. १४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत चाललेल्या अनधिकृत बॅनरविरोधी मोहिमेनंतर याला गती येईल असे वाटले होते, परंतु सर्व प्रभाग कार्यालयांनादेखील बॅनर लावण्याच्या जागा निश्चित करण्यासाठी सांगितले होते.

मात्र, याबाबत दहा दिवस उलटल्यानंतरही कुणीही माहिती सादर केली नव्हती. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित होताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. आता सर्व ९ झोन कार्यालयांतर्गत बॅनर लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने याबाबत पोलिस प्रशासनाचा अभिप्राय घेतला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडे यादी सादर केली आहे. त्यांच्याकडून अभिप्राय येताच जागा अंतिम केल्या जातील.

मनपाने ठरवून दिलेल्या जागेवर ५ दिवस असेल बॅनर मनपाने ठरवून दिलेल्या जागीच यापुढे बॅनर व झेंडे लावण्यात येतील. यात ८ बाय १२, ८ बाय १० आणि ५ बाय ८ या आकारात आता बॅनर लावण्यासाठी परवानगी मिळेल. यासाठी प्रतिदिवस दरही ठरवले आहे. पाच दिवसांच्या पुढे हे बॅनर ठेवता येणार नाही. यासाठी साधारण प्रतिदिन २०० ते ५०० रुपये दर आकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...