आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने राज्य नाट्य स्पर्धेत ‘वेडात म्हातारे वेगाने दाैडले तीन’ हे नाटक सादर केले. भुसावळकर दरवर्षी खूप मेहनतीने नाटकाचा प्रयाेग करतात. लेखक प्रकाश गावडे यांनी या वर्षी आत्महत्येसारखा संवेदनशील विषय या नाटकाद्वारे मांडला. पहिला अंक हा काहीसा संथ झाला. विषय विस्तार आणि कलावंतांच्या हालचालींमुळे नाटकाच्या गतीवर परिणाम हाेत हाेता. दिग्दर्शक राजेश पवार यांनी या बाबींवर बारकाईने लक्ष दिले असते तर प्रयाेग अधिक प्रभावी झाला असता. आत्महत्येसाठी प्रवृत्त हाेणे हे भेकडपणाचे लक्षण आहे. काेणत्याही परिस्थितीत जगण्याची ऊर्मी कमी हाेता कामा नये. पहिला अंक मात्र तीन म्हातारे आपापल्या आयुष्यात निराश झालेले. आपल्याच मुलांकडून अव्हेरलेले, अनुक्रमे जाेशी, जावडेकर आणि पवार या निराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्येचा विचार करतात. आणि त्या मार्गाला लागतात. तिघेही काही जुजबी सामान घेऊन या अंतिम प्रवासाला निघतात ते सायकलवरून.
वाटेत त्यांना त्यांच्या प्रमाणेच काहिसी स्थिती असलेले; परंतु हतबलतेचा सामना करीत जीवन जगत असतात. शेवटी तिघेही साेबत आणलेले विष घेऊन झाेपतात. इथे पहिला अंक संपताे. तिघांनी घेतलेल्या विषाचा परिणाम हा ते झाेपल्यानंतरच हाेणार असताे. दरम्यान, जावडेकर आणि पवार जाेशीला त्याच्या बराेबर असलेल्या रजनीबाईंचे मनाेगत एेकवतात. त्यात त्यांनी पुढील जीवन त्यांच्या बराेबर घालवायची इच्छा प्रदर्शित करतात. जाेशींना हीच जगण्याची ऊर्मी झाेपू देत नाही. ते उठतात आणि लगाेलग दाेघांनाही उठवतात. दाेघेही जाेशीप्रमाणेच जगण्याची इच्छा जागृत करतात. चालून येणाऱ्या वाघाचाही सामना करतात. दुसऱ्या अंकामध्ये दिग्दर्शक अपेक्षित परिणाम साधताे. घटनाक्रम वेगाने उलगडत जाताे. जे पहिल्या अंकात वेगाने आत्महत्येकडे तिघेही म्हातारे दाैडतात तेवढ्याच वेगाने रिव्हर्स येऊन स्वच्छंद जीवन जगताना दिसतात. आणि जगण्याचा मूलमंत्र देतात.
लेखक, दिग्दर्शक यांची मेहनत दुसऱ्या अंकामध्ये प्रकर्षाने जाणवली. तीन म्हातारे अनुक्रमे माेहित कांबळे, शुभम गुडा आणि किरण चाटे यांनी संयतपणे भूमिका पार पाडल्या. तिघांचेही आत्महत्येचे कारण आणि त्यामधून वाचल्यानंतरचा आशादायक प्रवास दाखवण्यात तिघेही यशस्वी हाेतात. तांत्रिक बाजूदेखील उल्लेखनीय. नेपथ्य, प्रकाश याेजना, नाटकाला पूरक अशीच हाेती. पहिल्या अंकावर थाेडीशी मेहनत दिग्दर्शक राजेश पवार यांनी घेतली असती तर तिघांचा आशादायक नाटकाचा प्रवास अधिक सुखकर झाला असता हे नक्की.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.