आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार:राज्य पुरातत्त्व विभाग संबंधित यंत्रणांशी करणार चर्चा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य पुरातत्त्व विभाग शहरातील ऐतिहासिक स्मारके, वारसास्थळांवरील अतिक्रमणे हटवणार आहे. त्यामुळे ही स्थळे लवकरच मोकळा श्वास घेतील, अशी शक्यता आहे. राज्य पुरातत्त्व विभाग अतिक्रमण हटवणार असून यासाठी महानगरपालिका, पोलिस प्रशासनासह या ऐतिहासिक स्मारके, वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमण हटवले जाईल, अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली.

राज्य पुरातत्त्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत १० ऐतिहासिक स्मारके, वारसास्थळे येतात. या स्थळांवर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. विभागाचे मकई गेटचे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून यासंदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करत आहे. याच पद्धतीने मकई गेट, दिल्ली गेट, भडकल गेट, पाणचक्की, नवखंडा पॅलेस, लाल मशीद, काळी मशीद, चौक मशीद, शहागंज मशीद येथील अतिक्रमण हटवणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती गोटे यांनी दिली.