आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार, या बुलेट ट्रेनसाठी सादरीकरण नाही दिले तरी चालेल; उद्धव ठाकरेंची ग्वाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना दिली निःसंदिग्ध ग्वाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, जनतेच्या विकास कामासाठी सरकार जनतेच्या पाठिशी आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निःसंदिग्ध ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गाच्या बाबतीत प्रेझेंटेशन दिले नाही तरी राज्य सरकार या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य करणार आहे. मी यामध्ये काही राजकारण आणू इच्छित नाही. राजकीय मतभेद असतील तर ते सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजे. पण अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची चर्चा सुरू होती त्यावेळी आमचे म्हणणे होते की याऐवजी राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी उपयोग होईल.

18 महिन्यात ही इमारत पूर्ण झाली पाहिजे

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जिल्हा परिषद इमारत केवळ आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे असे नाही तर सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असायला हवा. कोणत्याही परिस्थितीत 18 महिन्यात ही इमारत पूर्ण झाली पाहिजे. या अटींवर आपल्याला बांधकामासाठी जे काही 20 कोटी लागतात ते दिले जातील. लोकांनी कामासाठी या इमारतीत आले पाहिजे पण त्याहून जास्त म्हणजे ही इमारत इतकी चांगली बनवा की जिल्हा परिषदेची इमारत कशी असते ते नुसते पाहायला लोक आले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...