आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडून इंजेक्शन वाटप:केंद्राकडून राज्याला मिळाले 6380 व्हायल टोसिलिझुमॅब इंजेक्शन

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा प्रशासनाला इंजेक्शन वाटप करण्याच्या सूचना

राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येनंतर इतर औषधीसोबतच टोसिलिझुमॅब या इंजेक्शनची मागणी वाढली असून केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ६३८० व्हायलचा पुरवठा केला आहे. त्यानुसार राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमलसिंह यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून कोविड रुग्णांच्या तुलनेनुसार इंजेक्शनचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात नमुद केले की, राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविडच्या इतर औषधांसोबतच टोसिलिझुमॅब या इंजेक्शनची मागणीदेखील वाढली आहे. मात्र इंजेक्शनची आयात करावी लागत आहे. त्यानुसार केंद्राकडून हे इंजेक्शन आयात केले असून सिप्ला कंपनीद्वारे या इंजेक्शनचे वितरण केले जाते. त्यानुसार केंद्राने राज्यासाठी ६३८० व्हायल दिल्या आहेत. त्यानुसार हे इंजेक्शन सर्व जिल्ह्यांना सम प्रमाणात वितरित व्हावे यासाठी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या विचारात घेऊन त्या त्या जिल्ह्याला इंजेक्शनचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्याला ९८० व्हायल, सातारा २३०, सांगली १८०, सोलापूर २००, कोल्हापूर १८०, नाशिक २२०, जळगाव ११०, धुळे ३०, नंदुरबार २५, अहमदनगर २५०, औरंगाबाद ९०, जालना ६५, परभणी ६०, नांदेड ४५, हिंगोली १५, लातूर ९५, बीड १७०, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ६० व्हायल देण्याचे नियोजन आहे.

यासोबतच ठाणे ३००, पालघर १४५, रायगड ९०, रत्नागिरी १००, सिंधुदुर्ग ५०, अमरावती १०५, यवतमाळ ६५, बुलडाणा ५५, अकोला ५०, वाशीम ४०, नागपूर ४७०, वर्धा ७०, चंद्रपूर १६५, भंडारा ५०, गोंदिया ४०, गडचिरोली जिल्ह्यासाठी ३५ व्हायल दिल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...