आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस:राज्यात बुधवारपर्यंत राहणार पावसाचा जोर, बंगाल उपसागरात ईशान्येला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे वेधशाळेचा अंदाज

राज्यात बुधवारपर्यंत पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यात बुधवारपर्यंत पावसाचा जोर राहू शकतो. बंगाल उपसागरात ईशान्येला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेचा अंदाज
- २० सप्टेंबर - मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता.
- २१ सप्टेंबर - मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तर विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता.
- २२ व २३ सप्टेंबर - मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

बातम्या आणखी आहेत...