आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The Steering Wheel Of The Smart City Bus, Which Has Been Closed For 5 Months Due To The Strike Of ST Employees, Will Be Given To Private Drivers |MARATHI NEWS

निर्णय:एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 5 महिने बंद असलेल्या स्मार्ट सिटी बसचे स्टिअरिंग खासगी चालकांकडे येणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचारी संपामुळे स्मार्ट सिटीची सिटी बससेवा पाच महिने ठप्प राहिली. त्यामुळे मनपाने आता एसटी महामंडळासोबतचा करारच संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. तसेच खासगी एजन्सीचे चालक-वाहक नियुक्त करून एका महिन्यात सिटी बससेवा पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. दरम्यान, तीन महिन्यांत शहरात ३५ ई-सिटी बस दाखल होतील, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली. एसटी कर्मचारी २७ ऑक्टोबरपासून संपावर आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने स्मार्ट सिटीने माजी सैनिकांची नेमणूक करून १७ जानेवारीपासून १०० पैकी आधी ११ आणि नंतर ६ अशा १७ बसेस सुरू केल्या. मात्र अजूनही एसटी संप मिटलेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने खासगी एजन्सीमार्फत चालक-वाहक नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

अग्निशमन दलाचे सक्षमीकरण
मनपाने शहरात २२ मजली इमारती उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यादृष्टीने अग्निशमन दलाचे सक्षमीकरण करण्याची प्रक्रिया या आर्थिक वर्षात पूर्ण होणार असल्याचे पांडेय म्हणाले.