आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी भूमिका:सत्तेसाठीचा संघर्ष एकवेळ मान्य; पण संस्कार, परंपरांची पातळी सोडून सुरू असलेले हे राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेसाठी पातळी सोडून परस्परांवर शिवराळ भाषेत जी राळ उठवणे सुरू अाहे ते सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे नाही. महान संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने साहित्य, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत देशाला आदर्श घालून दिला. तो वारसा राजकीय नेत्यांनी धुळीस मिळवू नये. ज्या “साहेबांच्या’ नावावरून भांडत आहात त्या साहेबांनी दिलेल्या संस्कारांची तरी जाण ठेवा... हेच आमचे आवाहन...हीच “दिव्य मराठी’ची भूमिका.

गुवाहाटीतून आता ४० आमदारांची जिवंत प्रेतं येतील... गुवाहाटीहून ४० आमदारांची जिवंत प्रेतं येतील. त्यांना सभागृहात थेट पाेस्टमॉर्टेमसाठी पाठवू... गुवाहाटीत डुकरं फार आहेत. त्यात इकडची ४० डुकरं तिकडं गेली. तिथे रेड्यांचा बळी दिला जातो, डुकरांचा बळी महाराष्ट्रात देऊ... इति संजय राऊत

भूत होऊन मागे लागतील हीच जिवंत प्रेतं तुमच्यामागे भूत होऊन लागतील. राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केला आहे. - दीपक केसरकर

विधानभवनाकडे जाणारा मार्ग वरळीतून जातो हे लक्षात ठेवा ज्या दिवशी सभागृहात फ्लोअर टेस्ट असल्याचे कळेल तेव्हा हे लोक मुंबईत विमानतळावर उतरतील. पण एअरपोर्टवरून विधानभवनाकडे जाणारे रस्ते वरळी, परळ आणि वांद्रेतून जातात हे लक्षात ठेवा. एक फ्लोअर टेस्ट आत होईल आणि दुसरी बाहेर होईल... इति आदित्य ठाकरे

औकातीत राहा... शिंदे साहेबांमुळे संयम बाळगून आहोत. हा प्रश्न सुटला की जशास तसे उत्तर देऊ. औकातीत राहा. - आ. तानाजी सावंत