आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअस्वस्थ वाटू लागल्याने रायगाव (ता. करमाळा) येथील बारावीची परीक्षार्थी प्रेरणा विनोद बाबर हिला मंगळवारी करमाळा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण तिचा बुधवारी रसायनशास्त्राचा महत्त्वाचा पेपर होता. पेपर चुकू नये म्हणून थेट हाॅस्पिटलमधून सलाइनसह रुग्णवाहिकेतून प्रेरणा बाबर ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालय केंद्रावर दाखल झाली. यावेळी महाविद्यालयाचे केंद्र संचालक संभाजी किर्दाक यांनी तिला सलाइनसह पेपर सोडवता येईल, अशी अनुकूल व्यवस्था करण्याची तत्परता दाखवली.
‘प्रेरणा’दायी मनोबलाच्या जोरावर तिने रसायनशास्त्र पेपर दिला. प्रेरणा हि करमाळ्यातील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. पेपर सोडवताना देखील परिचारीका राजश्री पाटील यानी डॉ. रविकिरण पवार व डॉ. कविता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु ठेवले होते. प्रेरणाने सलाईनसह रसायनशास्त्राचा पेपर व्यवस्थीत लिहिला. पेपर कक्षातून बाहेर येताना प्रेरणाच्या चेहऱ्यावर आजारी असतानासुद्धा परीक्षा दिल्याचे समाधान दिसत होते. प्रेरणा बाबर म्हणाली, बारावीचे हे माझे अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष होते. त्यामुळे महत्वाचा रसायनशास्त्राचा पेपर चुकवायचा नव्हता. केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सहकेंद्र संचालक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. सुवर्णा कांबळे व इतर पर्यक्षेकांनी सहकार्य केल्यामुळे मी परीक्षा देऊ शकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.