आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांचे आदेश:पोलिस अधीक्षकांनी मागवला शेतातील गांजाचा अहवाल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक शेतांमध्ये आंतरपिकात गांजा लावला जातो. कृषी विभागाने त्याचा शोध काढून त्याचा अहवाल द्यावा, असे आदेश पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिले.

जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच कलवानिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात त्यांनी हे आदेश दिले. औषध विक्री केंद्रचालकांनी अमली पदार्थांचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचे आधार कार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीची खातरजमा करून विक्री करावी, अशी सूचना त्यांनी केली. अमली पदार्थाची विक्री रोखण्यासाठी औषधींच्या दुकानांना भेटी देऊन अहवाल मागवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...