आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा फज्जा:टार्गेट सव्वाअकरा लाखांचे, पण 9 दिवसांत झाल्या केवळ हजार तपासण्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे आरोग्य डॉ. तानाजी मंत्री सावंत यांनी नवरात्रीच्या काळात 18 वर्षावरील महिलांची 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी करण्याची योजना जाहीर केली. या 9 दिवसांच्या काळामध्ये सव्वाअकरा लाख महिलांची तपासणी करण्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला लक्ष दिले होते. मात्र, या नऊ दिवसांत केवळ हजारच तपासण्या झाल्याचे समोर आले आहे.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवात 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान' राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यातील पंधरा लाख महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागातर्फे ठेवण्यात आले होते. मात्र, नवरात्री दरम्यान दहा टक्के महिलांनाही याचा लाभ देणे आरोग्य विभागाकडून शक्य झाले नाही. आजपर्यंत ग्रामीण भागातील तीन लाख महिलांपर्यंत आरोग्य विभाग पोहचला. यामुळे आरोग्य विभागावर ओढलेल्या नामुष्कीने या मोहिमेला पुढील 15 दिवसाची मुभा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त आदेश पाळला, फक्त दवाखान्यात आलेल्यांचीच केली तपासणी विविध आजारासाठी दवाखान्यात येणाऱ्या महिलांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. हे आकडे देखील या तपासणीत घेण्यात आले आहे. यामुळे अभियानाचा कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याऱ्या महिलांची तपासणी करण्याचा मुख्य उद्देश बाजूलाच राहिल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाकडून फक्त मंत्र्यांचा आदेश पाळला गेल्याची चर्चा आहे.तर योजनेचा महिलांपर्यंत पोहचू शकली नाही अशी ही चर्चा होते आहे.

ग्रामीण भागातील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पर्याप्त डॉक्टर उपलब्ध नाही. उपलब्ध असलेले डॉक्टर सर्व महिलांची तपासणी करण्याचा प्रयत्न करत आहे. शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त महिलांची या अभियानात तपासणी करण्यात येणार आहे.

- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...