आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महिला बचतगटांना मास्क तयार करण्याचे काम, गटांची निवड झाली; प्रतिक्षा कच्च्या मालाची

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जवळपास चाळीस बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात येणार आहे

देशभरात कोरोना विषाणूने थौमान घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना सरकारी पातळीवर करण्यात येत आहेत. तसेच आरोग्यविषय आवश्यक सुविधा देखील पुरवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घेतली जात आहे. मात्र देशभरातील लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक सुविधा तोकड्या आहेत. त्यामुळे आता मास्क तयार करण्याची जबाबदारी ही महिला बचत  गटांना देण्यात आली आहे.

आजवर महिला बचत गटांचे काम हे केवळ उन्हाळयातील वाळवणाची पदार्थ करण्यापूर्ते समिती होते. नंतर शालेय पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात आले. मात्र बचत गटांच्या कामाबाबाद वाद-विवादही होते. परंतु आता या आपातकालीन स्थितीचा सामना करण्यासाठी एकजूटीची आवश्यकता आहे. या पाश्वभूमीवरच चाळीस बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात येणार आहे. निवड झालेल्या या चाळीस बचत गटांकडे शिलाइ मशीन आहे. तशी तयारी देखील या गटांनी दाखवली असल्याचे अभियान व्यवस्थापक एस.ए.दारकुंडे यांनी दिली असून, बचत गटांना मास्क तयार करण्यासंदर्भात विचारणा झाली असल्याचे मीरा शेख यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले. मीरा यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे आमचा मासूम महिला बचत गट आहे. आमच्यासह  इतर महिला बचत गट देखील यात आहे. ज्यात सुनीता मिसाळ, दिपाली मिसाळ, संगीता गोरडे, छाया खरात यांच्या बचत गटाचा देखील समावेश आहे. स्वत:च्या पायावर महिलांना स्वावलंबी बनवण्याबरोबरच महिला बचत आपली सामाजिक बांधिलकी देखील जपत असल्याचे मीरा शेख म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...