आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:नवीन मीटरसाठी तंत्रज्ञाने घेतली 16 हजारांची लाच ; अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे केली तक्रार

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन प्लॉटवर शेडचे बांधकाम झाल्यानंतर विद्युत मीटरसाठी अर्ज केलेल्या नागरिकाकडून १६ हजार २०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ साहेबराव बाबाराव घुगे (३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने नुकतीच जमीन खरेदी करून त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी हर्सूल-सावंगीतील महावितरणच्या उपविभागाकडे मीटरसाठी अर्ज केला होता. मात्र, घुगेने मीटर हवे असल्यास १६ हजार २०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तक्रारदाराने त्याची अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या आदेशावरून निरीक्षक संदीप राजपूत, सुनील पाटील, केवसलिंग घुसिंगे, दत्ता होरकटे यांनी सापळा रचून बुधवारी घुगेला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

बातम्या आणखी आहेत...