आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वाजेपर्यंत तीव्र थंडी:रात्री दर तीन तासांनी तापमान तीन अंशांनी घसरले, आज थंडी वाढणार

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंग गोठवणारी थंडी सुरू झाली आहे. रात्री साडेआठ वाजता किमान तापमान १८ अंश सेल्सियसवर होते. त्यानंतर साडेअकरा वाजता त्यात ३.२ अंशांनी घसरण होऊन ते १५ अंशांवर खाली आले. अडीच वाजता १२.८ आणि पहाटे साडेपाचला १२ आणि त्यानंतर वेगाने घसरण होऊन ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ८.९ अंश नीचांकी पातळीवर गेल्याची नाेंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. दर तीन तासांनी तापमानाचा आलेख बदलला. पहाटेच्या सत्रातील तीन तास तीव्र कडाक्याची थंडी राहिली.

सूर्याचे दक्षिणायन सुरू आहे. त्यामुळे तिरकस किरणे पृथ्वीवर पडतात. आर्द्रताही ३७ ते ५७ टक्क्यांपर्यंत राहते. शहरातील वाहने, कारखान्यातील कार्बन उत्सर्जन, सिमेंटच्या जंगलात जागोजागी हवेला अडथळे आहेत. हायमास्ट दिव्यांचा लखलखाट असतो. त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतरही वातावरणात उष्णता टिकून असते. त्यामुळे अतिशीत वारे दाखल होऊन थंडीची लाट सुरू झाली तरी रात्रीचे तापमान टप्प्याटप्प्याने कमी कमी होत जाते. औरंगाबादचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंशाने घसरून ते यंदाच्या सत्रात सर्वात कमी नोंदवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...