आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १९३ कोटीच्या पाणी योजनेच्या कामाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार टप्प्यातील फेर निविदा काढल्या होत्या. या निविदांनाही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता फेर निविदांमध्ये टप्पा एकसाठी दोन निविदा आल्या असून, उर्वरित तीन टप्प्यांसाठी पुन्हा निविदा मागवण्यात येणार आहे. ५ जानेवारी रोजी तीन टप्प्यांसाठी फेरनिविदा काढणार असून, सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली.
शहरातील पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी १९३ कोटींच्या निविदा काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जायकवाडीपासून ते नक्षत्रवाडीपर्यंत जुनी ७०० एमएमची पाइपलाइन बदलून ती ९०० एमएमची टाकणार आहे. पहिल्यांदा निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा फेरनिविदा काढली आहे. त्यातही जायकवाडी ते ढोरकीन या पहिल्या टप्प्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. ढोरकीन ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्र आणि फारोळा ते नक्षत्रवाडी या टप्प्यांसाठी प्रत्येकी एक निविदा आली. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २४ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रासाठी एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने तिसऱ्यांदा तीन टप्प्यांसाठी फेर निविदा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे रबडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.