आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस विभागाचे दुर्लक्ष:वाळूज येथील उद्योजकांच्या जागेतून मुरुमाची चोरी ; उद्योजकाच्या अंगावर ट्रक घालण्याचा झाला होता प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातील मोकळ्या भूखंडातून बिनदिक्कत मुरूम, माती चोरीचे प्रकार सुरू आहेत. एम-सेक्टरमधील एका नामांकित कंपनीच्या भूखंडातून मुरूम चोरीचा प्रकार एका उद्योजकाने १० मार्च रोजी उद्योजक संघटनेच्या निदर्शनास आणून दिला. उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका उद्योजकाने त्यांच्या मालकीच्या भूखंडात सुरू असणाऱ्या मुरूम चोरीला विरोध केला असता त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचे धाडस माफियाने केले होते. याप्रकरणी उद्योजकाने संबंधितांवर गुन्हा दाखल केला. मात्र, पुढे आठवडाभरातच पुन्हा परिसरात मुरूम चोरी सुरू झाली होती हे विशेष.

एमआयडीसी प्रशासनाच्या हरित पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर माफिया मुरूम चोरी करतात. खोदकामासाठी सर्रासपणे जेसीबीचा वापर, तर मुरूम वाहून नेण्यासाठी हायवा-ट्रकचा वापर केला जातो. एम सेक्टरमधील जागेतून माफियांकडून मुरूम चोरी केल्याने लगतच्या नामांकित कंपनीची संरक्षक भिंत पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत उद्योजकांनी एमआयडीसी आणि पोलिस प्रशासनाला जाब विचारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या माफियांविरोधात सहसा कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे धाडस करत नाहीत. एखाद्याने हिंमत करून पोलिसांशी संपर्क साधलाच तर पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वी माफिया वाहनांसह पसार होतात. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचतात, अशी खंत उद्योजकांतून व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...