आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावणार:जालना ते शिर्डी तीन दिवसांची डेमू रेल्वे सोमवारपासून धावणार

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना ते शिर्डी तीन दिवस आणि जालना ते नगरसोल तीन दिवस ही पूर्णत: विनाआरक्षण असलेली डेमू शटल रेल्वे २० जूनपासून धावणार आहे. कोरोनानंतर बंद करण्यात आलेली विनाआरक्षण गाडी प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी जालना ते शिर्डी डेमू धावेल. ती जालना येथून सकाळी ६.१५ वाजता निघेल. औरंगाबादला सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. ७.१० वाजता पुढे निघून शिर्डी येथे ११.५० वाजता पोहोचेल. तीन दिवस नगरसोलपर्यंतच ही गाडी शिर्डीहून दुपारी १.४० वाजता परत निघेल. सायंकाळी ७.३० वाजता औरंगाबादला व जालना येथे रात्री ९.१० वाजता पोहोचेल. बुधवार, शुक्रवार व रविवारी नगरसोलपर्यंतच धावेल. नगरसोलहून सायं. ५ वाजता निघेल.

बातम्या आणखी आहेत...