आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:कारागृहातील ओखळीनंतर ठरला वाहन भाडेतत्वावर घेऊन वाटमारीचा प्लॅन, पोलिसांच्या चौकशीत झाला उलगडा; तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

परभणी कारागृहात असतांना झालेल्या ओळखीनंतर तिघांनी वाहन भाडेतत्वावर घेऊन वाटमारीचा प्लॅन आखला होता. त्यानुसारच वाहन चालक युसुफ नौरंगाबादी यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी ता. 20 पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात कलासागर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी हिंगोली शहरालगत गारमाळ येथील वाहन चालक युसुफ नौरंगाबादी यांच्या खूनाची माहिती शिवाजी दशरथे (रा. जोडपरळी), जयराम शेळके (रा. दाती), आकाश मस्के (रा. गडदेगाव, आंबाजोगाई) यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांची परभणी येथील कारागृहात ओळख झाली. त्या ओळखीतून त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वाहन भाड्याने घेऊन चालकाचा खून करायचा असून त्या वाहनाचा वाटमारी साठी वापर करण्याचा प्लॅन तयार केला.

त्यानुसार त्यांनी ता. 11 ऑगस्ट रोजी हिंगोलीतून युसुफ नौरंगाबादी यांचे वाहन भाड्याने घेऊन त्यानंतर त्यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात त्यांची आणखी चौकशी सुरु असून त्यांनी आणखी इतर काही गुन्हे केले काय याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सांगितले.

वाहने भाड्याने देतांना प्रवाशांची माहिती द्या
जिल्हयातील वाहन चालकांनी वाहने भाड्याने देतांना कोणते प्रवाशी नेत आहेत, कुठे जाणार आहे, प्रवाशाचे नांव व भ्रमणध्वनी क्रमांक याची सविस्तर माहिती वाहन मालक तसेच कुटुंबियांनी द्यावी असे आवाहन पोलिस अधिक्षक कलासागर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...