आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद काेराेना:औरंगाबादमध्ये आज 26 रुग्ण आढळले, रुग्णसंख्या झाली 653; बळींचा आकडा 15 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 651

औरंगाबादेत मंगळवारी आणखी 26 जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 653 वर गेली आहे. तर रामनगरमधील 80 वर्षीय व पुंडलिकनगरमधील 58 वर्षीय या दाेघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 15 झाली. दिलासादायक बाब म्हणजे साेमवारी 40 जण काेराेनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. कोतवालपुरा, जुना बाजारसह सातारा परिसरातील सदानंदनगर या नवीन भागात रुग्ण सापडल्यामुळे हे भागही आता हाॅटस्पाॅट ठरले आहेत. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी 21 टक्के म्हणजे 131 रुग्ण रामनगर व संजयनगर या 300 मीटरवर अंतरावरील दाेन गल्ल्यांमध्येच आढळल्याने हा भाग आता डेंजर झाेन बनला आहे.

मुकुंदवाडी- संजयनगर हा काेराेनाचा माेठा हाॅटस्पाॅट ठरला आहे. या भागात तब्बल ८९ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हा भागच सील करण्यात आला आहे. आता रविवारपासून या गल्ल्यांच्या शेजारीच असलेल्या रामनगरमध्येही दाेन दिवसांत ४२ बाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या २१% रुग्ण या ३०० मीटर अंतरावरील दाेन वसाहतींतच सापडल्यामुळे आराेग्य विभागाने या भागात कसून तपासणी सुरू केली आहे. यापूर्वी आसेफिया कॉलनी, जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या दाेन किमीच्या परिघात सर्वाधिक रुग्ण सापडत हाेते. साेमवारी रामनगरमध्ये सापडलेल्या २२ रुग्णांत तीन, आठ, नऊ, ११ वर्षांची बालके आहेत. तर ६५ वर्षांच्या प्रत्येकी एक महिला व पुरुषाचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...