आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायगाव येथील शेतकरी महिलांचा अभ्यास दौरा:कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौऱ्याला प्रारंभ

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील 151 शेतकरी महिला अभ्यास दोऱ्यावर रवाना झाल्या आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवारी ( दि.10 ) रोजी हिरवा झेंडा दाखवून या दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला आहे. प्रारंभी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अभ्यास दौऱ्यातील शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांना मार्गदर्शन गरजेचे

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतात काम करतात. त्यामुळे पुरुषांप्रमाणे शेतकरी महिलांना देखील आधुनिक शेतीचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्याकरता शेतकरी महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी करता यावी यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

राज्यभर राबवणार प्रयोग

नैसर्गिक शेती, शेती पूरक व्यवसाय, कलम बांधणीचे नर्सरी प्रात्यक्षिक, कुकुट-शेळी पालन, एकात्मीक शेती प्रकल्प, गोड्या व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन व मत्स्य संवर्धन अशा विविध विषयाच्या अनुषंगाने या दौऱ्यात महिलांना अभ्यास करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा असून लवकरच हा प्रयोग राज्यभर राबवण्याचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यांची होती उपस्थिती

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, कायगावच्या सरपंच नंदाबाई जैवळ , उपसरपंच विश्वास दाभाडे , माजी सरपंच पाडुरंग जैवळ , मंडळ कृषी अधिकारी प्रमोद दापके सर, कृषी सहाय्यक सारिका पाटील, ग्रामसेवक प्रभाकर भादवे , ग्रा .स . बबनराव दाभाडे , राजेंद्र खरात , बबन जैवळ , अमोल खेत्रे ,चेअरन विठ्ठल जैवळ , धनंजय जैवळ , विष्णु जैवळ आदींची उपस्थिती होती.

इथे देणार भेटी

कायगाव ग्रामपंचायतिच्या वतीने 15 वा वित्त आयोग 2021-22 मधील महिला व बालकल्याणअंतर्गत शेतकरी महिलांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. राळेगण सिद्धी , हिवरे बाजार , राहुरी कृषी विद्यापिठ , बारामती , दापोली , कोकण कृषी विद्यापीठ , तुळजापुर , पंढरपुर , कोल्हापूर , जेजुरी या ठिकाणी जाऊन शेतकरी महिला प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...