आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता बैठकीत कोरोना नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टेसिंगचा फज्जा, शासनाने ठरवून दिलेले नियम मंत्र्यांना लागू नाहीत का?

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • जलसंपदा विभागाच्या बैठकीलाही चार तास उशीर

कळमनुरी व हिंगोली येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता बैठकीत सोमवारी ता. 28 कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. कुठेही सामाजिक अंतर नाही अन अनेकांनी मास्क न घातलाच गर्दी केल्याने मंत्र्यांना कोरोनाचे नियम नाहीत काय असा सुर नागरीकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंगोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी चार वाजता आखाडा बाळापूर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कळमनुरी येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

कोरोनाच्या नियमांची पायमल्ल्ली करण्यात आली. अनेकांचे सत्कार अन गर्दीमुळे सामाजिक अंतराचा पार फज्जा उडाला होता. कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये अनेकांकडे मास्कही नव्हते. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेले नियम मंत्र्यांच्या दौऱ्यातच पायदळी तुडविण्यात आल्याने सर्व समान्य नागरीकांतून तिव्र नाराजीची सुर उमटू लागला. तर मंत्र्यांना कोरोनाचे नियम नाहीत काय असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे आजपासूनच डेल्टा प्लस च्या भीतीने कोरोना बाबत नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये दुपारी ४ नंतर सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली आहे तर गर्दीचे कार्यक्रम घेऊ नये अशा स्पष्ट सूचना आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली होती. मात्र जलसंपदा मंत्री पाटील रात्री साडेसात वाजता बैठकीस हजर राहिले. त्यामुळे दुपारी तीन वाजल्या पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झालेले जलसंपदा विभागाचे अधिकारी व इतर विभागांचे विभाग प्रमुख चार तास ताटकळले होते. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांतूनही नाराजीचा सुर व्यक्त होऊ लागला होता.

बातम्या आणखी आहेत...