आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर्सूल गावातून जळगावकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर जकात नाक्यालगत मोठे वळण आहे. या वळणावर जळगावकडून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने नियमित अपघात घडतात. त्यामुळे हे वळण काढून टाकून रस्ता सरळ करावा तसेच सिग्नल बसवून स्पीड ब्रेकर तयार करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. तसे केल्यास संभाव्य अपघात टळतील आणि वाहतुकीसही अडचण निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.
हर्सूल-जळगाव रोड हा २४ तास वर्दळ असलेला मार्ग आहे. या रस्त्यावर काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले अाहेत. मात्र, जकात नाक्याजवळच्या वळणामुळे अनेक वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे तेथे नियमित अपघात घडतात. महिन्यातून किमान तीन गंभीर अपघात होतात. दररोज दुचाकी व छोट्या-मोठ्या वाहनांचे अपघातही होतात. त्यामुळे प्रशासनाने हे वळण काढून टाकून सरळ रस्ता तयार करावा, पेट्रोल पंपासमोर सिग्नल बसवावा, स्पीड ब्रेकर तयार करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
घाटात दररोज होतात छोटे-मोठे अपघात दिवसा आणि रात्रीही अंदाज येत नसल्याने दुचाकी ते अवजड अशा सर्वच वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सरळ करावा, अशी आमची मागणी आहे. - अनुराग जैस्वाल, पंपचालक
वळणावर तत्काळ स्पीड ब्रेकर बसवा जळगाव-कडून येणाऱ्या वाहनांची गती जास्त असल्याने व अचानक वळण आल्यामुळे त्यांना अंदाज येत नाही. तेथे तत्काळ स्पीड ब्रेकर बसवा. - दादाराव म्हस्के, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.