आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द बर्निंग कार:जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील धावत्या कारने घेतला पेट, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जळगाव महामार्गावरील गोळेगाव – लिहाखेडी परिसरात एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज बुधवारी रोजी घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत गाडी पूर्ण जळाली असून सुदैवाने कोणतीही जीवनहानी झालेली नाही.

सिल्लोड तालुक्यामधील पानवडोद बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान त्यांच्या कार क्रमांक एमएच 20 एफ वाय 5099 घेऊन आपल्या मित्राबरोबर औरंगाबाद- जळगाव महामार्गावरून सिल्लोडकडे जात असताना गोळेगावजवळील साई ढाब्याजवळ असलेल्या वळण रस्त्यावर अचानक या कारला आग लागली. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालकांने तत्परता दाखवत गाडी थांबवत सर्वांना खाली उतरवले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळी मदतीसाठी परिसरातील नागरिक दाखल झाले, आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधत गाडी बोलवण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या घटनेची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...