आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या ३० वर्षांपासून महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या उद्धवसेनेने आता पाणी तसेच गुंठेवारी प्रश्नासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी सांगितले की, सहा, सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी सभापती राजू वैद्य, अल्पसंख्याक संघटक अखिल शेख यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी वैद्य यांनी मोर्चाची माहिती दिली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कुठेतरी चुकते आहे, त्याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल. तनवाणींच्या नेतृत्वात नेमका कधी मोर्चा काढावा, याचे नियोजन सुरू आहे. पण तो लवकरात लवकर काढला जाणार आहे, एवढे नक्की आहे. उद्धवसेना जाती-धर्माला पाहणारा पक्ष नाही. समाजाला न्याय, प्रगतीची संधी देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या प्रभागात गुंठेवारीचा प्रश्न होता. त्याला आम्ही दहा वर्षांची मुदतवाढ दिली आहे. तरीही गती मिळत नाही. तनवाणी म्हणाले की, पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी लोकसेवेत स्वत:ला झोकून द्यावे. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून जनसामान्यांना न्याय द्यावा. या वेळी जिल्हा उपप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, सलीम कुरेशी, शहर उपप्रमुख दिग्विजय शेरखाने, अनिल जैस्वाल आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.