आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाने सगळे कसे हतबल ठरत आहेत,कोणी तडफडून मरत असताना त्याकडे लक्ष देण्याबद्दल कोणालाच गांभीर्य का वाटू नये, मृत्यू कसा स्वस्त होऊ लागलाय,असे अनेक प्रश्न निर्माण होण्याचे कारण तेरमध्ये सोमवारी पहायला मिळालेला क्लेषदायी प्रसंग. शासन कोरोनाचा महामारीचा संसर्ग पसरू नये, म्हणून प्रयत्नांची शिकस्त सुरू असली तरी हे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. तेर येथील एका खासगी क्लिनिकसमोर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाचा उपचाराशिवाय मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सुमारे पाच तास चक्क उघड्यावर पडून होता. या वयोवृध्द रूग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका किंवा रूग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे घंटागाडीतून किणी या गावी त्याचा मृतदेह नेण्यात आला.
तेरपासून जवळच असलेल्या किणी (ता.उस्मानाबाद) येथील छगन मेसबा सोनटक्के (६५) हा रूग्ण सोमवारी तेर येथील बस स्थानकासमोरील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी आला होता. त्याठिकाणी तपासणी करून रूग्णाला शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. परंतू हा रूग्ण क्लिनिकसमोर कोसळून जागीच मयत झाला. त्यानंतर याची माहिती ढोकी पोलिसांना देण्यात आली. पोलीस पंचनाम्यानंतर या रूग्णाची ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जागीच कोविड तपासणी केली. त्यात तो कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला. हे सोपस्कार होण्यास तीन तासाचा कालावधी लोटला. नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह कीटमध्ये घातला. एवढ्यावरही या मृतदेहाची अवहेलना थांबली नाही. नातेवाईकांना मृतदेह नेण्यासाठी वाहन मिळाले नाही. अखेर तेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत या मयताचा अखेरचा प्रवास किणीपर्यंत सुरू झाला. तब्बल पाच तासापर्यंत हा संतापजनक प्रकार पहावयास मिळाला. या वृध्दाचा मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आला. या घटनेवरून स्थानिक प्रशासकीय यंत्रणा गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी किती प्रयत्न करीत आहे,याचा अंदाज येतो.
गंभीर रुग्णांवर उपचार होईनात
जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे.कोरेाना रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी रूग्णालयात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. कोरेाना तपासणीसाठी आता संशयित रूग्ण गर्दी करू लागले आहेत. तपासणीनंतर काही जण तातडीने रूग्णालयात भरती होण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी त्यांना बेड मिळत नाहीत. त्यामुळे काही रूग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत गंभीर झालेल्या रूग्णांवर जागेअभावी उपचार होणे कठीण होत आहे.
कर्मचाऱ्यांनी मृतदेह कीटमध्ये घातला. एवढ्यावरही या मृतदेहाची अवहेलना थांबली नाही. नातेवाईकांना मृतदेह नेण्यासाठी वाहन मिळाले नाही. अखेर तेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत या मयताचा अखेरचा प्रवास किणीपर्यंत सुरू झाला. तब्बल पाच तासापर्यंत हा संतापजनक प्रकार पहावयास मिळाला. या वृध्दाचा मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आला. या घटनेवरून स्थानिक प्रशासकीय यंत्रणा गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी किती प्रयत्न करीत आहे,याचा अंदाज येतो.
..तर वाचले असते प्राण
कोरेाना पॉझिटिव्ह आढळलेल्या किणीच्या रूग्णाला वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचू शकले असते. संबंधित रूग्णाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या नातेवाईकाने सोमवारी सकाळी खासगी रूग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत वेळ गेली होती. गाव पातळीवर अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे कोरेानाची लक्षणे आढळताच रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाचा उद्देश आहे. ही यंत्रणा कागदावरच काम करत असेल तर रूग्णांना मदत कशी मिळणार, त्यांची लक्षणे काेण तपासणार, असा प्रश्नच आहे. त्यामुळे प्राण वाचविण्यासाठी तातडीने निदान आणि तातडीने उपचार अत्यावश्यक आहेत.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे कर्मचारी गेले कुठे?
प्रशासनाने गावागावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राबविले आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठी पथक नेमण्यात आली आहेत.किणीमध्ये सोनटक्के यांना गंभीर लक्षणे असताना किंवा ते रूग्णालयात येईपर्यंत त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्या आजाराची माहिती पथकाने मिळविली नव्हती का, रूग्णालयात येईपर्यंत रूग्णाचा मृत्यू कसा होतो, रूग्णाला गावात तपासण्यात का आले नाही, त्याच्या कुटुंबियांची तपासणी कोण करणार, हे पथक केवळ कागदारवरच काम करतेय का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.