आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The University Administration Formed A Three member Committee To Submit A Report Within Two Days On The Burning Case Of Research Students In Aurangabad.

औरंगाबादेतील संशोधक विद्यार्थीनी जळीत प्रकरण:2 दिवसात अहवाल द्या- कुलगुरुंचे आदेश, विद्यापीठ प्रशासनाकडून 3 सदस्यीय समिती

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका संशोधक विद्यार्थीनीला शासकीय विज्ञान संस्थेच्या आवारात पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न तरुणाने केला. तरुणाने स्वःतही जाळून घेतले असून या प्रकरणी दोन दिवसांत अहवाल सादर करा असे आदेश कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी आज दिले.

यांचा समितीत समावेश

'संशोधक विद्यार्थी' आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आणि विद्यार्थीनीला जळल्या प्रकरणी तीन सदस्यांची समितीची स्थापन करण्यात आली आहे. यात कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीत विभागप्रमुख डॉ. ई. आर. मार्टिन व डॉ. अंजली राजभोज या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही कुलगुरुंनी दिले आहेत.

कुलगुरुंकडून तात्काळ दखल

विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थ्याने शासकीय विज्ञान संस्थेच्या आवारात असलेल्या जैव भौतिक शास्त्र विभागात जाळून घेतल्याची घटना घडली. या संदर्भात बेगमपूरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सदर घटनेची माहिती कुलगुरुंना यांनी दिली, यानंतर घटनेची कुलगुरु यांनी तत्काळ दखल घेतली. तसेच विभागाच्या वतीने दोन्ही संशोधक विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना माहिती देण्यात आली.

घाटीत घेतली त्यांची भेट

संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनीच्या जळीत कांडानंतर समिती सदस्यांसह परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, सुरक्षा अधिकारी बी. एल. इंगळे हे 'घाटीत' रात्री गले तेथे त्यांनी उभयंतांची भेट घेवून विचारपूस केली आहे.

बातम्या आणखी आहेत...