आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:विद्यापीठ समितीनेही केली श्री साई फार्मसीची चौकशी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा एमआयडीसी येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चची शुक्रवारी तंत्रशिक्षण विभागाच्या तीन सदस्यीय समितीने झाडाझडती घेतली. त्यानंतर शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीनेही चौकशी केली.

तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांच्या आदेशाने शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मौर्य, डॉ. प्रियानंद आगळे, डॉ. प्रशांतकुमार शामकुंवर यांनी कॉलेजला भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली होती. त्यांनी अहवालही सादर केला होता. आता विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रो. डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीने पाहणी केली. डॉ. प्रशांतकुमार शामकुंवर, डॉ. सचिन भुसारी यांचा या समितीत समावेश होता. ‘वर्षाला ८० हजार फीस, पण कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाणी, गॅसही मिळत नाही’ या मथळ्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने २९ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर समित्यांनी चौकशी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...