आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड भरण्याची नोटीस:विद्यापीठाने संलग्नीकरण यादीतून वगळली 27 महाविद्यालयांची नावे

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या ४० कॉलेजांना प्रशासनाने आता चांगलीच अद्दल घडवली आहे. ४० पैकी ‘नॉट रिचेबल’ असलेल्या २७ कॉलेजांना संलग्नीकरणाच्या यादीतूनच वगळले आहे. संलग्नीकरण शुल्क न भरता विद्यापीठाशी संलग्नित १३ कॉलेजकडून आता दामदुप्पट संलग्नीकरण शुल्क वसूल केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंच्या आदेशान्वये १० मार्चपर्यंंत दुप्पट शुल्क भरण्याचे पत्र जारी केले आहे. ‘नॉट रिचेबल’ २७ कॉलेजांपैकी ‘बाटू’ आणि ‘एमजीएम’कडे संलग्नित झालेले १६ कॉलेज आहेत.

अनेक वर्षांपासून विद्यापीठाला ४९४ कॉलेज संलग्नित असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात २७ कॉलेजांचा थांगतपत्ताच लागत नव्हता. संलग्नीकरणासह अन्य कुठलेही शुल्क न भरता हे कॉलेज विद्यापीठाला संलग्न असल्याचे संकेतस्थळावर दर्शवले जात होते. अशा ‘नॉट रिचेबल’ कॉलेजांचा विद्यापीठाने आता कायमचा ‘हिशेब’ चुकता केला आहे. २७ कॉलेजांची माहिती संकेतस्थळावरील संलग्नीकरण यादीतून वगळली आहे. त्यामध्ये एमजीएम खासगी विद्यापीठाकडे ८ कॉलेज गेले. एमजीएमचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे कॉलेज डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्नित होते.

आता ते एमजीएम युनिव्हर्सिटीकडे असेल. आणखी ८ अभियांत्रिकी कॉलेज लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला (बाटू) संलग्नित झाले आहेत. उर्वरित ११ कॉलेज खरोखर ‘नॉट रिचेबल’ होती. तीन कॉलेजने कधीही संलग्नीकरण शुल्क भरले नव्हते. १० कॉलेज तर विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षा शुल्क भरतात, पण संलग्नीकरण शुल्कालाच फाटा देतात. अशा एकूण १३ कॉलेजांकडून दुुप्पट संलग्नीकरण शुल्क वसूल केले जाईल. कुलगुरूंनी त्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. संबंधित संस्थांचालकांना तशा नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत.

तज्ज्ञ समित्यांनी शोधले सत्य : कुलगुरूंनी विशेष ड्राइव्ह घेऊन परीक्षा विभाग, शैक्षणिक विभाग आणि वित्त विभागातील असमन्वय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण ५१ महाविद्यालयांची यादी निश्चित केली. कुलगुरूंनी ३ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. समितीने अहवाल सादर केला. त्याचे वर्गीकरण करून २७ महाविद्यालयांना संलग्नीकरण यादीतून आता हटवले आहे.

दुप्पट शुल्क भरावे लागणारी महाविद्यालये अशी पुष्पक काॅलेज, अशोका हाॅटेल ऑपरेशन अँड केटरिंग सर्व्हिस सायन्स, हरसिद्धी साॅफ्ट स्किल डेव्हलपमेंट कॉलेज यांनी परीक्षा शुल्क व संलग्नीकरण अर्ज भरले नाहीत. संत गाडगे महाराज काॅलेज ऑफ एज्युकेशन, स्वामी विवेकानंद काॅलेज, अजंता आर्ट अँड सायन्स काॅलेज, इंदिरा आर्ट अँड सायन्स काॅलेज, आर्ट, सायन्स अँड काॅमर्स काॅलेज छत्रपती संभाजीनगर, बीड येथील जयहिंद वुमेन काॅलेज ऑफ आर्ट, राजमुद्रा एसआर काॅलेज, यशवंत आर्ट काॅमर्स अँड सायन्स काॅलेज, जालन्यातील शरदचंद्र पवार महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय यांनी परीक्षा अर्ज भरले, मात्र संलग्नीकरण शुल्क भरलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...