आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी परीक्षा:विद्यापीठाने आजचे पदवी परीक्षेचे पेपर पुढे ढकलले ; यूपीएससी परीक्षेला केंद्र ताब्यात दिल्याचे कारण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यूपीएससी परीक्षेसाठी प्रशासनाला महाविद्यालयांचे केंद्र ताब्यात दिल्याचे कारण देत ४ जून रोजी होणारा पदवी परीक्षेचा पेपर पुढे ढकलला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून ५ जून रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याचे कळवले आहे. त्यासाठी ४ जून रोजी परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने विद्यापीठाने शनिवारचा पेपर पुढे ढकलला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली. आता सर्वच पेपरच्या तारखांमध्ये बदल होणार का, या प्रश्नावर प्र-कुलगुरू श्याम शिरसाट म्हणाले, विद्यापीठाचा पेपर ४.३० वाजता संपणार होता. स्पर्धा परीक्षेच्या वेळी केंद्र ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दोन दिवस आधी येते. परंतु त्यांनी हे पत्र दोन दिवस उशिराने पाठवले. ४ जूनचा पेपर पुढे ढकलला तरी त्याचा नियोजित वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. पुढे ढकललेला पेपर नेमका केव्हा होणार याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

परीक्षेतील गोंधळाचा अहवाल शासनाला सादर विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गुरुवारच्या पेपरला विजयेंद्र काबरा महाविद्यालय व शेंद्रा येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर एका बाकावर तीन विद्यार्थी बसवण्यात आले होते. याची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला. दोन दिवसांत सविस्तर अहवाल पाठवण्यात येणार आहे. झालेला प्रकार चुकीचा असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. मंत्री सामंत यांनी कुलगुरूंकडे अहवाल मागितला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...