आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कव्वाली:ख्वाजा सय्यद शाह नुरुद्दीन हुसेनी चिश्ती यांचा उरूस उद्यापासून शहरात होणार सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुना बाजार परिसरात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसजवळ दर्गाह हजरत ख्वाजा सय्यद शाह नुरुद्दीन हुसेनी चिश्ती निजामी कलीमी राह. यांचा उरूस ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या वेळी गुसल, शरीफ व कव्वाली, जुलूस-ए-संदल, मेहफिल-ए-समा, संदल माली, कुरानख्वानी आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

८ फेब्रुवारीला रात्री ईशाच्या प्रार्थनेनंतर गुसल, शरीफ आणि कव्वाली होतील. ९ रोजी मगरीबच्या नमाजनंतर दर्गा परिसरातील मशिदीतून मिरवणूक निघून दर्ग्यावर पोहोचेल. त्यानंतर मेहफिल-ए-समा होईल. १० फेब्रुवारी रोजी सकाळी फजरची नमाज संदल माली, सकाळी ८ वाजता कुराण ख्वानी कार्यक्रम होईल. ईशाच्या नमाजानंतर रात्री १० ते २ या वेळेत मेहफिल-ए-समा कार्यक्रम होईल. ११ फेब्रुवारी रोजी ईशाच्या नमाजनंतर चिराग आणि मेहफिल-ए-समामध्ये उत्तर प्रदेश आणि हैदराबादचे प्रसिद्ध कव्वाल कलाम सादर करतील. १२ रोजी सकाळी १० वाजता समारोप होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन सय्यद शाह अझरुद्दीन हुसेनी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...