आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:डॉ. राजन शिंदेंच्या हत्येत दोन प्रकारच्या हत्यारांचा वापर; कपाळावर तीन मोठे वार कुटुंबीयांभोवती संशयाची सुई कायम

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची दहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर सिडकोतील एन-४ येथील राहत्या घरात गळा, दोन्ही हातांच्या नसा चिरून निर्घृण हत्या झाली. घाटी रुग्णालयात त्यांचे पोस्टमाॅर्टेम झाले. त्यात मारेकऱ्याने डॉ. शिंदेंवर हल्ला करताना दोन हत्यारांचा वापर केल्याचे म्हटले आहे.

मराठवाडाच नव्हे तर राज्यस्तरीय सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या डॉ. शिंदेंच्या खुनाने अनेकांना हादरा बसला. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांनी स्वत: चौकशीची सूत्रे हाती घेऊन सोमवारी डॉ. शिंदेंच्या बंगल्यात ठाण मांडले होते. कुटुंबीयांवरच संशयाची सुई कायम असली तरी २४ तासांनंतरही पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाही. मात्र, घाटीच्या पोस्टमाॅर्टेम विभागाने पोलिसांकडे दिलेल्या पोस्टमाॅर्टेम (शवविच्छेदन) अहवालाचा काही तपशील दिव्य मराठी प्रतिनिधीला मिळाला. ताे अत्यंत महत्त्वाचा आहे.

सूत्रांनुसार, मारेकऱ्याने दोन हत्यारांचा वापर केला. त्यातील एक हातोडा किंवा लोखंडी रॉडसारखे होते. त्यातील लोखंडी रॉडचा एक तडाखा डोक्याच्या मागील बाजूला केला, तर कपाळावर तीन घाव घातले. हा तडाखा व घाव शक्तीनिशी झाल्याने डॉ. शिंदे भेलकांडले असावेत. त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता या फटक्यांनी एकदम कमी झाली असावी. त्यानंतर मारेकऱ्याने धारदार हत्याराने त्यांचा डावा कान तीन चतुर्थांश कापला. मग गळा मणक्यापर्यंत म्हणजे दीड ते पावणेदोन इंच खोलवर चिरला. त्यामुळे डॉ. राजन यांना ओरडणेही शक्य झाले नसावे. अहवालानुसार चार ते पाच सेंटिमीटर खोलवर वार करत हाताच्या नसा कापण्यात आल्या. एखादी लोखंडी, लाकडी वस्तू कापण्यासाठी वापरले जाणारे हे धारदार हत्यार असावे. आता दोन्ही हत्यारे शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

मारेकरी छातीवर बसला होता
सूत्रांच्या माहितीनुसार हातोड्याच्या फटक्याने अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेल्या डॉ. राजन यांच्या छातीवर मारेकरी काही मिनिटे बसला. छातीवर बसूनच त्याने त्यांच्या दोन भुवयांच्या अगदी अचूक मध्यभागी धारदार हत्याराने एक बारीक आकाराचा वार केला. ती जखम ठळकपणे दिसेल अशी काळजी मारेकऱ्याने घेतली असावी.

३ ते ४ मिनिटांत खेळ खलास
फार झाले तर तीन ते चार मिनिटांत मारेकऱ्याने डॉ. राजन यांचा प्राण घेतला, असा प्राथमिक अंदाज आहे. हल्ला केल्यावर राजन कितपत प्रतिकार करू शकतील, याचा त्याने अभ्यास केला असावा, अशीही बाब समोर येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...