आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेड सुविधा वाढवण्यात घाटी राज्यात दुसऱ्या स्थानी:घाटीमध्ये सध्या कोरोना रुग्णांसाठी 760 बेड राखीव; मुंबई, पुणे, नागपूरनंतर ऑक्सिजन टँकची सर्वाधिक क्षमता

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • डॉक्टर, कर्मचारी, नर्स, महसूल प्रशासन सर्वांच्या प्रयत्नामुळे बेड वाढवणे शक्य झाले

राज्यात मुंबईत जीजीएमसी व जेजे रुग्णालयात ९५८ बेड आहेत. त्यानंतर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी सर्वाधिक ७६० बेडची व्यवस्था करण्यात आली. बेड उपलब्धतेच्या बाबतीत घाटीचा राज्यात दुसरा क्रमांक लागत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. तसेच ऑक्सिजन टँकच्या बाबतीतही मुंबई, पुणे, नागपूरनंतर घाटीची क्षमता सर्वाधिक असल्याचे त्या म्हणाल्या. घाटीत सुरुवातीला केवळ मेडिसिन विभागात कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात होते. सध्या सुपरस्पेशालिटीमध्ये ३०५ बेड आहेत, तर शंभर बेड आणखी प्रस्तावित आहेत. घाटीचे बेड वाढवण्यात घाटीच्या प्रशासनासोबतच महसूल विभागाचा मोठा पुढाकार राहिला. त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच सध्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सतत पाठपुरावा केला. तसेच उपायुक्त जगदीश मणियार तसेच उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी सुविधेचा रोज आढावा घेतल्यामुळे बेड वाढवणे शक्य झाले.

कुठे किती आरोग्य सुविधा?
बेड ऑक्सिजन टँक

 • मुंबई जीजीएम व जेजएच ९५८ ११.४ केएलचे दोन
 • पुणे बीजेएमसी व एसजीएच ६३२ ४० केएल क्षमतेचे
 • नागपूर आयजीएमसी ६८० २० केएलचे तीन
 • जळगाव ३६८ २० केएलचा एक
 • कोल्हापूर ४८० २० केएल
 • बारामती जीएमसी २६४ ६ केएल
 • अकाेला जीएमसी ३८७ १० केएल
 • सोलापूर ३८३ १९ केएल
 • अंबाजोगाई वै. महाविद्यालय ४४७ २० केएल​​​​​​
 • नांदेड २१० २० केएल

घाटीत ३३ केएलचा ऑक्सिजन टँक
घाटीत ऑक्सिजन टँक बसवण्यासाठी डॉ. येळीकर यांनी आग्रह धरला होता. त्याला विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निधीच्या माध्यमातून साथ दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर घाटीत सर्वाधिक ३३ केएलचे टँक आहेत, तर २० केएलचे टँक बसवले. लवकरच ते कार्यान्वित होतील.

घाटीत १ हजार बेड हवेत
सध्या घाटीने एक हजारपर्यंत बेड करण्याची गरज आहे. त्यामुळे रुग्णाला त्याचा फायदा होईल. तसेच घाटीला सध्या ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र घाटीने ऑक्सिजनचा योग्य रीतीने वापर करत त्यांचे ऑक्सिजनचे वेस्टेज कमी करावे. - सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त.

कर्मचारी मिळाल्यास आणखी बेड वाढवू
डॉक्टर, कर्मचारी, नर्स, महसूल प्रशासन सर्वांच्या प्रयत्नामुळे बेड वाढवणे शक्य झाले. मनुष्यबळ कमी असतानाही अाराेग्य सुविधा देत अाहाेत. आणखी कर्मचारी मिळाल्यास बेड वाढवण्याची तयारी आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी.

बातम्या आणखी आहेत...