आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होणार आहे. या वेळी सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी कळवले आहे.
यासंदर्भात जारी परिपत्रकात असे म्हटले की, ‘सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना’ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहावेच लागेल. प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्यासह अधिष्ठाता सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.