आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:माळीवाड्यात बारागाड्या ओढून पूर्ण केले नवस ; कोरोनाकाळात दोन वर्षे निर्बंध

दौलताबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळीवाड्यात शेकडो वर्षांपासून लक्ष्मीमाता यात्रा भरते. लक्ष्मीमातेचा नवस पूर्ण करण्यासाठी भाविक बारागाड्या ओढतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते. बारागाड्या दौलताबाद वेशीपासून सकाळी सुरू होऊन संध्याकाळी आठ वाजता लक्ष्मी माता मंदिरापर्यंत ओढण्यात येतात. त्यानंतर गावात मिरवणूक काढण्यात येते. कोरोनाकाळात दोन वर्षे निर्बंध असल्याने यंदा मोठ्या उत्साहात यात्रा भरली. सकाळपासून भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी झाली होती. परिसरात खेळणी, पूजेसाठी लागणारी साहित्य आदी दुकाने थाटली होती. या वेळी माळीवाडा सरपंच अनिता सुधाकर हेकडे, उपसरपंच कडू कीर्तिकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मुळे, धम्मपाल गायकवाड, जनार्दन वाघमोडे, सुधाकर हेकडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...