आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सुल तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचले:नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतीक्षा कायम

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सुल तलावतील पाणी उपसा वाढवण्यासाठी स्वतंत्र 350 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. मंगळवारी जॉईंटवरील पाण्याची गळती बंद करून तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचले आहे. येथून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी आणखी एअर वाल, क्रॉस कनेक्शन टाकण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी वेळ लागणार असल्याने वाढीव पाणी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

जायकाडीत यंदा भरपुर पाणी आहे. मात्र, जूनी जिर्ण झालेल्या वाहिनीतून नागरिकांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे मनपाला जराकीचे होत आहे. यावर मात करण्यासाठी हर्सुल तलावातील पाण्याचा उपसा वाढवण्यासाठी तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम गत पंधरा दिवसांपासून सुरु होते. यासाठी पाणी पुरवठ्याचा एक दिवसाचा शेटडाऊनही घेण्यात आला. हे काम कुठपर्यंत आले, याबाबत 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता. मंगळवारी जलवाहिनीला गळती लागली होती. नवीन जलवाहिनी असल्याने सर्व गळती जाॅईंटवरच होत्या. जेसीबी आणि कामगारांनी एकाच दिवसात चार ठिकाणची गळत बंद केली.

तत्पूर्वी सोमवारी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. मध्यरात्री पर्यंत पाणी सोडून चाचणी घेण्यात आली. जलवाहिनीच्या जॉईंटवर पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर गळती बंद करण्यात आली. आता जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाढीव अतिरिक्त पिण्याचे 5 एमएलडी पाणी पोहोचले आहे.

आधी 5 एमएलडी पाणी येत होते. त्यामुळे जलकुंभाात एकुण 10 एमएलडी पाण्याचा साठा व नागरिकांच्या घरापर्यंत पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, वाढीव पाणी सोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन टाकणे, एअर होल्स बसवणे नितांत गरजेचे असून यासाठी किती वेळ लागेल, हे निश्चित सांगतात येणार नाही पण आम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नागरिकांना वाढीव पाणी पोहोचवू असे एमजीपीचे अजय सिंग यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...