आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:वॉचमनचा खून ; तिघांना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोंढा नाका परिसरात बिडी-सिगारेटच्या गोडाऊनमधील वॉचमनचा खून करून गोडाऊनमधील तीन लाख ४४ हजारांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी दिले. सलीम जब्बार अहमद अन्सारी (४८, रा. मुंबई), मोहंमद नियाज मोहंमद इब्राहिम चौधरी (३२, रा. धुळे, मूळ उत्तर प्रदेश) आणि मुबारक अली शहा गुलाम हुसेन शहा (३५, रा. नालासोपारा) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात मृत पाशा अफजल मुगल (७०, रा. मोंढा नाका) यांचा मुलगा केसर पाशा मुगल (३४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, मृत पाशा सुमारे २२ वर्षांपासून बालाजी एंटरप्रायझेस बिडी, सिगारेटच्या गोडाऊनवर वॉचमन म्हणून काम करत होते. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे आरोपींनी त्यांचा खून करुन गोडाऊनमधील ऐवज चोरुन नेला. प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या वतीन अॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...