आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुणाची कृपा:873 प्रकल्पांतील पाणीपातळी62.82 टक्क्यांवर, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

औरंगाबाद ( संतोष देशमुख)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या प्रकल्पांत 73 टक्के तर मध्यम प्रकल्पांत 55 टक्के जलसाठा

आजवर मान्सून पाऊस चांगला पडला आहे. मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील जलसंचय २६ टक्क्यांवरून ६२.३२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. जायकवाडी ८२ टक्के, येलदरी, सिद्धेश्वर , विष्णुपुरी १०० टक्के, पेनगंगा व मानार ८० ते ९० टक्क्यांसह ११ मोठ्या प्रकल्पात ७३.७९ टक्के तर मध्यम ७५ प्रकल्पांत ५५.४९ टक्के जलसंचय झाला आहे. समाधानकारक पाणीसंचय झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. खरीप पिकांसह रब्बी पेरणीसाठी, बांधकाम व्यवसाय, उद्योगांसाठी पाणीसाठा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

मराठवाड्यात जूनमध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडला. जुलै व ऑगस्टमध्ये काही ठिकाणी खंड तर जेथे पोषक वातावरण तेथे पाऊस पडला. तर बहुतांश ठिकाणी ढगांचे आच्छादन व भुरभुर पाऊस पडला आहे. विशेषत: १० ते २३ ऑगस्ट दरम्यान जोरदार ते हलका पाऊस झाल्याची नोंद झाली. म्हणजेच पावसाचे वितरण असमान राहिले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला अाहे. तर लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २६ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४८२.३ मिमी सरासरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५५३.८ मिमी म्हणजेच ११४.७ टक्के पर्जन्यमान झाले. विशेषत: गत पंधरा दिवसांतील पावसाने मोठ्या व मध्यम आणि बंधाऱ्यातील जलसंचयात वेगाने वाढ झाली आहे.

त्यानुसार जायकवाडी ८२.०३ टक्के, निम्न दुधना ६६.०५, येलदरी १००.०९ भरले असून ४२१९.०० क्युसेक, सिद्धेश्वर १०० टक्के भरले व ७२८० पेक्षा अधिक क्युसेकने विसर्ग झाला आहे. तर माजलगाव ७३.२७ मांजरा २.०६, पेनगंगा ८९.७४, मानार ७९.०७, निम्न तेरणा -०.५७, विष्णुपुरी १०० टक्के जलसंचय असून १६६३३ क्युसेकने विसर्ग झाला आहे, सिना कोळेगाव - ९४.८०, शहगड बंधारा ००, खंडका बंधारा १०० टक्के भरलेला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम : जलसंपदाच्या गत शुक्रवारच्या अहवालानुसार मोठ्या तीन प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, मध्यम ५ प्रकल्प कोरडे तर १३ जोत्यात आहेत. १० प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसंचय आहे. तर लघु प्रकल्पांची अवस्था वाईट असून ७५२ पैकी ५२ कोरडे ठाक, २१४ जोत्यात तर १२९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसंचय झाला आहे. म्हणजेच जेथे पाऊस कमी पडलाय तेथील प्रकल्प आजही तहानलेले आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य असून उरलेल्या मोसमात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

उद्योग, व्यवसाय, खरीप पिकांना व रब्बी पेरणीसाठी उपयुक्त ठरणार मराठवाड्यातील प्रकल्पातील पातळी (दलघमी)

नाव संख्या पाणीसाठा उपयुक्तसाठा %
मोठे प्रकल्प ११ ५१४३.०० ३७९५.०० ७३.७९
मध्यम ७५ ९४०.४३४ ५२१.८६१ ५५.४९
लघु ७४९ १७१२.८७७ ६३३.००९ ३६.७९
गोदावरी बंधारे १३ ३२४.७७४ १८७.८९६ ५७.८५
तेरणा, मांजरा, २५ ७५.६७६ १६.३४५ २१.५९९ रेणा बंधारे
एकूण ८७३ ८१९६.७६ ५१५४.११ ६२.८२

पुढील तीन दिवस पावसाचे
पंधरा दिवसांनंतर पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकऱ्यांनी काढणीस आलेले पिकांची सोंगणी करून सुरक्षित ठिकाणी शेतमाल ठेवावा. गुरुवारपासून तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी जेथे पोषक वातावरण निर्माण होईल तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत मळणी करणे उचित ठरेल. कीड व रोगावर कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करावी.