आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली, घटना शनिवारी देवानगरीत घडली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर उभ्या महिलेजवळ जाऊन धक्का देत तिच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना शनिवारी देवानगरीत घडली.

सोनम जैस्वाल या रात्री ८.३० वाजता घरासमोर उभ्या होत्या. तेव्हा अचानक त्यांच्याजवळ दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी जैस्वाल यांना धक्का दिला. त्यात त्यांच्या हातातील मोबाइल खाली पडला. त्या मोबाइल उचलण्यासाठी खाली वाकताच दुचाकीवर मागे बसलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून तोडली व पळ काढला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक गीता बागवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोर अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील, समोरच्या अंगात काळा शर्ट, तर मागे बसलेल्याने पिवळा रंगाचा टी शर्ट परिधान केलेला होता. काळ्या रंगाच्या पल्सरवरून त्यांनी संग्रामनगर पुलावरून पोबारा केला. त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील आमदार रस्त्यावर सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, सातारा पोलिस ठाण्यात तशी नोंद झालेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...