आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिगारेट घेण्याच्या बहाण्याने दुकानात गेल्यानंतर दोघा चोरट्यांनी महिलेला आधी सीसीटीव्ही आहेत का, असा प्रश्न केला. त्यावर तिने नाही असे सांगताच चोरट्यांनी तिच्या कानातील सोन्याचे झुमके ओरबाडले. यात तिचा कान तुटता तुटता राहिला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चार वाजता रामनगरात घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत लूटमार करणारा आरोपी सुंदरलाल बाबूराव राठोड (३७), सतीश संजय पवार (२१, दोघेही रा. मुकुंदवाडी) यांच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, सतीशचे पंधरा दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. ९ मे रोजी त्याच्या लहान बहिणीने प्रियकराच्या मदतीने त्याच्या आईची हत्या केली होती.
रामनगरात इंद्रायणी शिवाजी इलग (५०) यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्या दुकानात बसलेल्या असताना दुपारी ४ वाजता दुचाकीवर दोन तरुण ग्राहक म्हणून आले. त्यांनी सिगारेट विकत घेतली. त्यानंतर त्यांनी इंद्रायणी व आसपासच्या दोन तरुणांना येथे सीसीटीव्ही आहेत का, असे विचारले. कॅमेरे नाही, असे काहींनी सांगितले. त्यानंतर राठोडने त्यांचा कान पकडून सोन्याचा झुमका तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी प्रतिकार केला असता चोरांच्या हाती अर्धाच झुमका लागला. सुदैवाने त्यांच्या कानाला दुखापत झाली नाही. हाती लागलेले अर्धे झुमके घेऊन चोरांनी पोबारा केला.
आईच्या खुनात बहीण सुधारगृहात, आता चोरटा मुलगाही गेला तुरुंगात ९ मे रोजी मध्यरात्री बाळापूर शिवारात सुशीला संजय पवार (३९) यांचा खून झाला होता. सुशीला यांच्या १७ वर्षांच्या मुलीने तिचा प्रियकर दीपक बताडे, प्रियकराचा मित्र व १३ वर्षांच्या मैत्रिणीच्या मदतीने त्यांचा गळा चिरून खून केला होता. त्यानंतर दोघी अल्पवयीन मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली तर प्रियकर, मित्र हर्सूल कारागृहात आहे. सतीश सुशीला यांचा मोठा मुलगा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मुलीचा प्रियकर दीपक याच्या लहान भावालादेखील नुकतेच पिस्तूल विकताना उपनिरीक्षक म्हस्के यांनीच अटक केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.