आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 सदस्यांना दाखवला ‘ऊंचाई’ चित्रपट:जैनमच्या महिलांनी जाणून घेतली वृद्ध मित्रांची कहाणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन मित्रांची वृद्धापकाळातील गिर्यारोहणाची कहाणी असलेला ‘ऊंचाई’ चित्रपट जैनम महिला मंचाच्या ४०० सदस्यांना दाखवण्यात आला. उतारवय प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचा मंत्र आणि ऊर्जा या सिनेमात आहे. उपक्रमासाठी सुंदर कांकरिया, ललिता साकला, पल्लवी ओस्तवाल, हर्षा कुंकुलोळ यांचे सहकार्य मिळाले. जैनम महिला मंचाच्या संस्थापक अध्यक्ष भारती बागरेचा यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन झाले. या वेळी अध्यक्ष मंगला पारख, सचिव आशा कासलीवाल, करुणा साहुजी उपस्थित होत्या.जैनम महिला मंचच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून मंचच्या ४०० सदस्यांना सिनेमा दाखवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...