आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० परिषदेसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधींनी मंगळवारी शहराचा निरोप घेतला. सायंकाळच्या विमानाने एकूण १६ महिला प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनातर्फे निरोप देण्यात आला. संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात, पुष्पहार, पैठणी देऊन केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या होत्या.
हॉटेल रामामध्ये महिलाविषयक परिषद व चर्चासत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, चवदार पौष्टिक पदार्थाचा आस्वाद त्यांनी घेतला. विमानतळावर आगमन आणि पाहुण्यांचे निरोप सुरळीत व्हावे यासाठी विमानतळ प्रबंधक डी. जी. साळवे यांची टीम तसेच स्वागत समितीतील सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार ज्योती पवार आदींनी पाहुण्यांना निरोप दिला. चैर्ली मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रान्सिस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन यांनी प्रयाण केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.