आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला खेळाडूंना बक्षीस प्रदान:टेनिस बॉल स्पर्धेत वंडर वुमन्स संघाला सर्वसाधारण विजेतेपद

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा योग व टेनिस बॉल क्रिकेट संघटना आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त योगासन व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गत महिन्यात आयोजन करण्यात आले होते. टेनिस बॉल स्पर्धेत वंडर वुमन्सच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. गरवारे कम्युनिटी सेंटर संघ उपविजेता आणि गरवारे बालभवन संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्या महिला खेळाडूंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सुतवणे, प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर जगताप, संघटनेचे सुरेश मिरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेच्या सचिव छाया मिरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भक्ती राठोड यांनी मानले.

विजेत्या महिला खेळाडू पुढीलप्रमाणे

18 ते 28 वर्षे गट - अंकिता भोकरे (एमए योगशास्त्र विभाग), नेहा पिठोरे (एमजीएम). 28 ते 35 वर्षे वयोगट - मंजुश्री गिरी (गरवारे कम्युनिटी सेंटर), पल्लवी भागवत (गरवारे कम्युनिटी सेंटर), रसिका गायकवाड (युनिक योग वर्ग), पल्लवी गावंडे (वाळूज), विद्या कोकणे (भारतीय योग संस्थान), मीनाक्षी हजारे (गरवारे कम्युनिटी सेंटर), वैष्णवी रहाणे (गरवारे कम्युनिटी सेंटर). 45 वर्षे वयोगट - शोभा काळे (युनिक योग वर्ग), माधुरी महाजन (भारतीय योग संस्थान), मंदाकिनी सरजे (भारतीय योग संस्थान), ऊर्मिला पैठणकर (भारतीय योग संस्थान), संगीता गडगिळे (युनिक योग वर्ग), अंजली ठाकूर (मुकुंद मंदिर), रेणुका देशपांडे (युनिक योग वर्ग).