आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडावरून स्वराज्य निर्माण केले. या अनमोल किल्ल्याचा संवर्धनाचे काम मी हाती घेतले. त्या कामाचे सकारात्मक वृत्त विस्तृतपणे फक्त दैनिक दिव्य मराठीने दिले. अशाच प्रकारे चांगले काम लोकांपर्यंत घेऊन जाणे, आदर्श शिकवण वृत्तांच्या माध्यमातून पोहोचवून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम दैनिक दिव्य मराठी अविरतपणे करत आहे ते कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. दैनिक दिव्य मराठी यशाचे शिलेदार पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थित थाटात संपन्न झाला.
सिडकोतील हॉटेल फर्न रेसिडेन्सी सभागृहात दैनिक दिव्य मराठी आयोजित यशाचे शिलेदार पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन, दीपप्रज्वलानाने झाली. दिव्य मराठीचे सीईओ नितिश जैन, राज्य सेटॅलाईट हेड सुभाष बोंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजेंचा फेटा बांधून, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात बोंद्रे यांनी दैनिक दिव्य मराठीच्या 11 वर्षांच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. वृत्तपत्रात मराठी हा शब्द केवळ दिव्य मराठीत असल्याचेही अभिमानाने नमुद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या(19 फेब्रुवारी)जयंतीपासून राज्यातील कानाकोपऱ्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची दिव्य मराठीने यशोगाथा प्रसिद्ध केली होती. त्याच यशाचे शिलेदारांचे आज आपण गौरव करत असल्याचे सांगितले. तर सीईओ जैन यांनी सामाजिक, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रातील चांगले कामाविषयाची माहिती सर्वांसाठीच प्रेरणादयी असते. आदर्श रोल मॉडल म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वाढीस लागतो. सूत्रसंचलन निता पानसरे, सोलापुर युनिट हेड नवशाद शेख यांनी आभार मानले. यावेळी युनिट हेड बेंजामीन रॉक, जळगावचे युनिट हेड संजीव पाटील, आदींची उपस्थिती होती.
सर्वांनी काम करणे गरजेचे, तुमची जबाबदारी वाढली
छत्रपती युवराज संभाजी राजेंच्या हस्ते पुरस्कार मिळाला म्हण्ून तृप्त होऊन नका, आज जो यशाचे शिलेदार पुरस्कार तुम्हाला मिळतोय, त्यामुळे तुमची जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजाच्या हितासाठी आणखी चांगले काम करावे व पुन्हा पुरस्कार पटकावण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रात आज जे काही चालले आहे ते न पटणारे
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेच कार्याला सुरुवात होत नाही. पण त्यांच्या संस्काराची, कार्याची थोडी तरी जान आपण ठेवतो का? आजची महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली की, आपल्याला शोभत का? असा खेदजनक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे जे काही चालले ते न पटणारे असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमुद केले.
आज जून संपत आला आहे. बहुतांश ठिकाणी अत्यल्प पाऊस पडलाय. त्यामुळे पेरणी लांबली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. विद्यार्थी, बेरोजगार, क्रीडा, यासह विविध प्रश्नांनी लोक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणीच नाही. हरियाणा, पंजाबचे सरकार क्रीड पुरस्कार प्राप्त खेळाडूंना लगेच नोकरी देते. आमच्याकडे लक्षच दिले जात नाही. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम मी हाते घेतले. त्यानुसार शास्त्रोउक्त पद्धतीने काम पूर्ण होत आहे. मात्र, आणखी 299 किल्ल्यांच्या संवर्धनाचे काय? याकडेही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्वांनी चिंतन करण्याची व आवाज उठवण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमुद केले.
राजवाड्यात जन्म घेतला म्हणून राजा होत नाही, जो लोकांतून राजा होतो तोच खरा राजा माझा जन्म छत्रपतींच्या घरात झाला. राजवाडाचा राजा होयाचे कि, रयतेचा राजा होयाचे? असा प्रश्न मला घरातूनच राजमातांनी विचारला होता. 2009 मध्ये निवडणूकही लढलो व 25 हजाराहून अधिक मताधिक्याने हारलो देखील. यात पैसाही गेला होता. यावेळीचा अनुभव खूप कामाला आला. तसेच राजवाड्यातील राजा होण्यापेक्षा लोकांच्या मनातील राजा होण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात केली. आज 30 पैकी 25 दिवस जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत राहतो. हार पत्कारायची नाही. कठोर परिश्रम करायचे आणि यश मिळवायचे. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे संत महात्मे, शाहू, फुले, आंबेडकराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी नवीन परिवर्तनासाठी तयार रहावे, असे आवाहनही केले.
हे आहेत यशाचे शिलेदार
सहकार रत्न अंबादास मानकापे, रमेशअण्णा मुळे, अॅड. अभिषेक जैस्वाल, राजेंद्र साबळे पाटील, देविदास अधाने पाटील, डॉ. अमोल चाटे, धनराज पांडे, अमित दगाडे पाटील, रवी गायकवाड, एजाज मंझूर आलम शेख, रवींद्र आनंदराव पाटील, नंदकिशोर तिवाडी, जितेंद्र लाड, अभिराज शिंदे, संजय सोनी, सागर गाधवे, अमोल कासार, नितीन मुलतानी, अक्षय संजू ढोबळे, बाबा हमीज जाफरी, हर्षल माने, केतन ढाके, जितेंद्र ठाकूर, आशिष अजमेरा, हर्षवर्धन दहिते, दुष्यंतराजे देशमुख, रामभाऊ कडू महाजन, प्रतापसिंग नारायणसिंग पाटील, डॉ. संजय शेळके या मान्यवरांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते यशाचे शिलेदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.