आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:एन-6 संभाजी कॉलनीत ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्याचे काम अर्धवटच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-६ संभाजी कॉलनी भागातील एफ सेक्टरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची उंची मोठी केल्याने व दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. विद्युत खांब घराला लागून आहेत. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न करता अर्धवट सोडल्याने पाण्याची तळी साचत आहेत.

संभाजी कॉलनीत गेल्या काही महिन्यांपासून समस्यांचा डाेंगर उभा राहिला आहे. लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे काम केले. परंतु, रस्त्याची उंची मोठी केल्याने एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाता येत नाही. त्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. एन-६ स्मशानभूमीसमोरील मुख्य रस्ता ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आला. परंतु, तेथे दुरुस्तीचे काम न केल्याने पाण्याचे तळे साचले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. याकडे मनपा दुर्लक्ष करत आहे.

तारांचा प्रश्न मार्गी लावावा
संभाजी कॉलनी एफ सेक्टरमध्ये घराला खेटून विद्युत खांब असून तारांचे जाळे पसरल्याने धोका वाढला आहे. अनेकदा तक्रार करूनही वीज वितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. -पुष्पा खंडारे

रस्त्याचे काम करावे
स्मशानभूमीसमोर सिमेंटचा मुख्य रस्ता ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदला. त्यानंतर रस्ता दुरुस्त न करता सोडण्यात आला. त्यामुळे पाण्याचे तळे साचले जाते. या ठिकाणचा रस्ता चांगला करावा.
-सुधाकर साबळे

कचऱ्यांची समस्या
संभाजी कॉलनीत अनेक ठिकाणी कचरा पडून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या ठिकाणी नियमित फवारणी करून कचऱ्याची समस्या सोडवली पाहिजे.
-रवी दाभाडे

बातम्या आणखी आहेत...