आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2700 कोटींचा खर्च:पाणी योजनेच्या जॅकवेलचे काम जायकवाडीत सुरू

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २७०० कोटींच्या नव्या योजनेत अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या जॅकवेलच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी जायकवाडीत तब्बल ९०० मीटर पंपहाऊस उभारुन हा जॅकवेल घेण्यात येत आहे. महिन्याभरात प्रत्यक्ष पुलाच्या कामाला सुुरुवात होईल, अशी माहिती जेव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रत्यक्ष पुलाचे काम सुरु करण्यापूर्वी पाण्याची पातळी कमी असलेल्या ३७५ मीटर लांब व १२ मीटर रुंद रस्ता भराव टाकून एका महिन्यात केला जाणार आहे. पैठण ते नक्षत्रवाडी भागात जे पाईप टाकताना जे खड्डे केले त्यातील माती भरावासाठी वापरली जाईल.

जानेवारीपासून कालव्यातून जास्त पाणी सोडल्यानंतर धरणातील पाणीपातळी कमी होते, या काळात जॅकवेलच्या कामाची गती वाढवण्यात येईल. रस्त्याची खोली ३० मीटर असेल. ६०० मीटर रस्ता संपल्यावर त्याच्यापुढे ३७५ मीटरचा बांध बांधला जाणार आहे. त्यानंतर जॅकवेलच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. रस्ता आणि बांधाचे काम ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होऊ शकेल.

सर्वात मोठे पंप हाऊस : धरणात सध्या पाच पंप हाऊस आहे. मनपाचे जुने पंप हाऊस जे धरणाच्या काठावरच आहे. ब्रह्मगव्हाण आणि जालन्याचे पंप हाऊसदेखील काठापासून काही मीटर अंतरावरच आहे. सर्वात मोठे पंप हाऊस डीएमआयसी, एमआयडीसीचे आहे. हे ६०० मीटर आत आहे पुढे त्यांनी २०० मीटरचा चर घेतला आहे.

हे पंप हाऊस तयार करण्यासाठी ५ वर्ष लागले. शहरासाठीचा नवीन पंप हाऊस त्यापेक्षा ३०० मीटर पुढे असणार आहे. त्याच्यापुढे चर असणार आहे. उन्हाळ्यात धरणाचे पाणी कमी झाले तरी पाणी पुरवठा सुरळीत रहावा, हा या मागचा हेतू आहे. संपूर्ण जॅकवेलसाठी २७०० कोटीचा खर्च येणार आहे. धरणात ४० मीटर उंच पंप हाऊस असणार आहे. एक वर्षात हे पंप हाऊस तयार करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

कॉपर डॅम टेक्नोलॉजी : धरणात पाणी असतांना काम करण्यासाठी ‘कॉपर डॅम टेक्नोलॉजी’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ३७५ मीटर मातीचा रस्ता झाल्यानंतर ज्या ठिकाणी पुल तयार करण्यासाठी कॉलम घ्यायचे आहे. त्या ठिकाणी लोखंडची भींत करुन पाणी अडवण्या येईल. तेवढे पाणी उपसून त्या ठिकाणी कॉलम उभारणीचे काम करण्यात येईल.

साडेपाच किलोमीटर जलवाहिनी
जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान ३९ किलोमीटरची २५०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. ही जलवाहिनी टाकण्यासाठी औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्याच्या बाजूने साडेसात किलोमीटरपर्यंत खोदकाम आतापर्यंत पूर्ण झाले आणि साडेपाच किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात आली. अडीच किलोमीटर जलवाहिनी तयार आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम खंडित न होता ते सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...